कोपरगाव तालुका
वाळू प्रतिबंधक पथकावर हल्ला,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गौण खनिज उपसा करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंध असतानाही गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा सुरु असून वाळूचोरांची वाळू उपसा प्रतिबंधक पथकावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली असून यात फिर्यादी काकडी येथील तलाठी बाळू फकिरा कोळगे (वय-५४) यांचेवर दि.२७ जानेवारी रोजी मुर्शतपुर ग्रामपंचायत हद्दीत विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या पॉवर ट्रॅक या ट्रॅक्टरवरील पाच वाळूचोर यांनी हल्ला करून ताब्यात घेतलेले वाहन ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून पाण्याची पातळी खोल असतानाही बरेच वाळूचोर फरंड्यांचा वापर करून अवैध वाळूउपसा करत होते.आता तर पाण्याची पातळी बरीच खाली गेली आहे.त्यामुळे वाळूचोरांना रान मोकळे मिळाले आहे.दरम्यान महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे अवैध वाळू उपसा करणाऱ्या कडून हप्ते गोळा करू लागले असल्याची गुप्त खबर मिळाली आहे.त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे या वाळूचोरांवर धाक कसा राहू शकेल ? असा सवाल निर्माण झाला आहे.बऱ्याच वेळा हप्ते घेणारे महसुल कर्मचारीच वहाने पकडण्यास जातात त्या वेळी हा धोका हमखास उदभवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळें यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.आता तर या वाळूचोरीत अडथळा ठरणाऱ्या वाळू उपसा प्रतिबंधक पथकावर हल्ला करण्यास हे वाळूचोर मागे पाहायला तयार नाही.अशीच घटना नुकतीच मुर्शतपुर ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच पाहायला मिळाली आहे.
कोपरगाव महसूल विभागातील वाळू उपसा प्रतिबंधक पथकाला मुर्शतपुर शिवारात वैध वाळू उपसा सुरु असल्याची गोपनिय खबर मिळाली असता त्यांनी वाळू पथकातील काकडी येथील तलाठी त्या ठिकाणी दि.२७ जानेवारी रोजी दुपारी ०१.५५ वाजेच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी त्यांना एक निळ्या रंगाचा पॉवर ट्रॅक विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू चोरी करताना आढळला होता.त्या पथकाने सदरचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन त्याला कोपरगाव येथील महसूल मुख्यालयात घेऊन जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या चार वाळूचोरांनी सरकारी पथकाचे वाहन अडवून त्यांच्या गाडीवर दगड फेक करून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व गाडीची मागील काच फोडून शासकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर हे वाहन घेऊन पोबारा केला आहे.
या प्रकरणी वाळू उपसा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख व काकडी येथील तलाठी बाळू फकिरा कोळगे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अज्ञात वाळूचोरांचे विरुद्ध गु.क्रं.१९/२०२२ भा.द.वि.कलम ३५३,३७९,३४१,१८६,१८८,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मारदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करित आहेत.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून पाण्याची पातळी खोल असतानाही बरेच वाळूचोर फरंड्यांचा वापर करून अवैध वाळूउपसा करत होते.आता तर पाण्याची पातळी बरीच खाली गेली आहे.त्यामुळे वाळूचोरांना रान मोकळे मिळाले आहे.दरम्यान महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे अवैध वाळू उपसा करणाऱ्या कडून हप्ते गोळा करू लागले असल्याची गुप्त खबर मिळाली आहे.त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे या वाळूचोरांवर धाक कसा राहू शकेल ? असा सवाल निर्माण झाला आहे.बऱ्याच वेळा हप्ते घेणारे महसुल कर्मचारीच वहाने पकडण्यास जातात त्या वेळी हा धोका हमखास उदभवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.दरम्यान याबाबत आ.काळे यांच्या कानावर हि बाब गेल्याची माहिती आहे.असा वाळूउपसा सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याच्या बातम्या आहेत.तर महसूल विभाग त्यांच्याकडे केवळ बघ्याची भूमिका घेता आहे हे विशेष !