न्यायिक वृत्त
पदाचा गैरवापर,जिल्हाधिकाऱ्यांकडून सरपंच पदासह सदस्यत्व रद्द?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील उत्तरेस साधारण ०९ किमी अंतरावर असलेल्या अंचलगावाच्या सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या सरपंचपदाचा गैरवापर करून स्वतःचा मुलगा घरकुलासाठी पात्र नसतांना देखील बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घरकुल मंजूर करून घेतले होते.तसेच सदरचे मंजूर घरकुल सरकारी जागेत अतिक्रमण करत बांधले होते.त्यावर विरोधी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती.त्यांची सुनावणी होऊन सरपंच खिरडकर यांना आपल्या पदासह सदस्य पदालाही मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अंचलगावच्या कोल्हे गटाच्या सरपंच मंगला खिरडकर यांच्या कागदोपत्री हिंदू धनगर असा जातीचा उल्लेख आहे.परंतु त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून हिंदू खाटीक जातीचे बनावट जात प्रमाणपत्र तयार करत सदर घरकुलाचा लाभ तर घेतलाच पण त्याच बरोबर हे घरकुल ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेत बांधले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती.या कामी सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मुलाला मदत केली असल्याचा आरोप होता.त्यातून हे महाभारत घडले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील अंचलगावच्या कोल्हे गटाच्या सरपंच मंगला खिरडकर यांच्या कागदोपत्री हिंदू धनगर असा जातीचा उल्लेख आहे.परंतु त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून हिंदू खाटीक जातीचे बनावट जात प्रमाणपत्र तयार करत सदर घरकुलाचा लाभ तर घेतलाच पण त्याच बरोबर हे घरकुल ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेत बांधले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती.या कामी सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मुलाला मदत केली असल्याचा आरोप होता.त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार आ.आशुतोष काळे गटाचे दादासाहेब बनसोडे व कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सन -२०२१ साली अर्ज दाखल करून सरपंच मंगला खिरडकर यांच्या मुलाचे विरोधात दाद मागितली होती.त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट जात प्रमाणपत्र मिळविले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.यावेळी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून समाज कल्याण विभागाने सदरचे बनावट प्रमाणपत्र जमा करण्यात येणार असल्याचे तक्रारकर्त्यांना लेखी कळवले होते.
त्यानुसार दादासाहेब बनसोडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांचेकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करत अंचलगावच्या सरपंच मंगला खिरडकर यांचे सरपंचपद रद्द करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
समाजकल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे काळे गटाचे दादासाहेब बनसोडे यांनी ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल करून सरपंच मंगला खिरडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मुलाला घरकुलाचा लाभ दिल्याचे तसेच अतिक्रमणाच्या जागेवर घरकुल बांधल्याचे पुरावे ॲड.एम.यु.सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते.
सदरच्या तक्रारीची माहिती घेवून सादर केलेल्या कागदपत्रांची व पुराव्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर चौकशी व पडताळणी केली असता तक्रारकर्ते दादासाहेब बनसोडे यांनी दिलेली माहिती खरी असल्याचे सिद्ध झाल्याने अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी मंगला खिरडकर यांचे सरपंचपद व त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.



