निवड
समताच्या ‘आस्वाद’ मेस विभागाला आयएसओ मानांकन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
युनायटेड किंग्डम येथील आंतरराष्ट्रीय मानक संघटनेकडून (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलमधील मेस विभागाला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली व अन्न आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आयएसओ-9001 व 22000 असे दर्जेदार व्यवस्थापन पद्धत व फूड सेफ्टी दर्जा प्रमाणित मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.संस्थेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या मेस व किचन विभागाच्या कार्यकारी विश्वस्त सुहासिनी कोयटे यांनी आयएसओचे लिड ऑडिटर कमलेश कोते यांच्या हस्ते स्विकारले आहे.