गुन्हे विषयक
कालव्यात महिला मयत तर नातू बचावला,’देव तरी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव हद्दीतील गोदावरी कालव्याच्या डाव्या कालव्यातून आज सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास महिला कल्पना नंदकुमार शिंदे (वय-६०) आणि त्यांचा नातू वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असून यात सदर महिलेचा नातू आश्चर्य कारक रित्या बचावला असल्याची माहिती हाती आली आहे.सदर महिला हि पढेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब शिंदे यांच्या भावजई तर नंदू पंढरीनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत अधिकृत माहिती प्राप्त नव्हती त्यांनी माहिती घेऊन ती कळवतो” असे आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.
मयत महिला कल्पना शिंदे यांचे छायाचित्र.
सदर महिला कालव्यांवर का गेली होती.व नातू कसा गेला होता हे समजले नाही.मात्र सदर महिला हि संवत्सर शिवारातील पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांचे वस्तीनजीक वाहत जाताना काही ग्रामस्थानीं पहिली व त्यांनी तिला काढण्यात यश मिळवले आहे.मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.मात्र ०३ वर्षीय नातू मात्र आश्चर्य कारक बचावला आहे.या बाबत ग्रामस्थांकडून अगदी स्वाभाविकपणे,’देव तारी.त्याला कोण मारी’ या मराठी म्हणीचा प्रत्यय आला असल्याची प्रतिक्रिया आली आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेने पढेगाव आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी अद्यावत होत आहे…..