निधन वार्ता
भास्कर महाराज दाणे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील ह.भ.प.भास्कर महाराज दाणे (वय-६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भारतीय रेल्वेत नोकरीत असताना कुटुंबाला लागलेल्या अध्यात्माच्या गोडीमुळे ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी अनेक दशके कीर्तन सेवेतुन समाजप्रबोधन केले होते.
स्वगृही संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारुन दरवर्षी तुकाराम बीज उत्सव साजरा करुन सप्ताहाचे नियोजन करुन त्यात कथा कीर्तनांचे आयोजन करत.रेल्वेतील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ठाणे सोडून आपल्या मुळगावी पढेगाव येथे राहुन पुर्णवेळ हरि भजनात घातला.त्यांच्या मागे पत्नी,भाऊ,मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.