जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातून…यांची रयतच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचे नेते व अ.,नगर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी या निवडीचे पत्र वर्पे यांना दिले आहे.त्यांच्यांन निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आपल्या राजकीय प्रवासात अनेक चढ उतार अनूभवले आहे.पूर्वी कोल्हे राष्ट्रवादीत असताना त्यांची प्रदेश सचिव पदी निवड झाल्यावर त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी त्या बाबतचे फलक झळकावले असताना त्याची शाई वाळते न वाळते तोच ईशान्य गडावरील तत्कालीन नेत्यांनी ते उतरविण्यास भाग पाडले होते.वरीष्ठ नेत्यांचा त्यांनी विश्वास मिळवला असला तरी या वेळचा अपवाद वगळता स्थानिक नेत्यांच्या रोषाला त्यांना कायमच बळी पडावे लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच रयत शिक्षण संस्थेची बैठक संपन्न झाली आहे.त्यावेळी त्यांची निवड झाली आहे.संदीप वर्पे हे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वर्पे यांचे चिरंजीव असून त्यांच्या मातोश्री या सद्गुरू गंगागिरी महाराज महावीयद्याल्याच्या माजी प्राध्यापिका आहेत.ते वर्तमानात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष असून कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आहेत,गेल्या ५ वर्षांपासून एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपालिकेमध्ये ५ नंबर तळ्याची मागणी करणारे पत्र देणारे प्रथम नगरसेवक,खा.शरद पवार यांच्या व पवार कुटुंबियांच्या जवळचे व्यक्तिमत्त्व मानले जातात.

त्यांच्या निवडीचे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार,खा.सुप्रिया सुळे,माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,उत्तर विभागाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर,भगीरथ शिंदे,मीनाताई जगधने,राजेन्द्र फाळके,अरुण कडू पा.,अशोकराव बाबर,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close