जाहिरात-9423439946
निवड

राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी…यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनची अध्यक्ष पदाची निवडणुक नुकतीच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून यात अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल रावसाहेब सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या निवडीचे नगर जिल्ह्यासह राज्यात स्वागत होत आहे.

    

   “अनिल सोनवणे यांनी बांधकाम क्षेत्रातील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक प्रगत देशांना भेटी दिल्या आहेत.बांधकाम व्यवसायापुढील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था,सरकार आणि बिल्डर्स असोसिएशन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करणार असल्याचे निवडीनंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

नूतन अध्यक्ष अनिल सोनवणे हे मूळचे कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असून अनेक वर्षांपासून कोपरगाव आणि जिल्ह्यात येथे ‘पॅसो कन्स्ट्रक्शन’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून बांधकाम व्यवसायात कार्यरत असून,अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.त्यांचा याखेरीज शिर्डी येथे हॉटेल व्यवसाय आहे.बांधकाम क्षेत्रतील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.बांधकाम व्यवसायापुढील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था व बिल्डर्स असोसिएशन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करणार असल्याचे सोनवणे यांनी निवडीनंतर आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.दरम्यान हि बिनविरोध निवड हि अनेक वर्षांनी झाली आहे.सदर बैठकीच्या अध्यक्षपदी केंद्रीय बिल्डर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विश्वनाथ हे होते.

  

राज्य बिल्डर्स असोसिएशन या संघटनेसमोरील आगामी काळात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक धाडसी स्वभाव याचा विचार करून कोपरगाव येथील बिल्डर अनिल सोनवणे यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली असून अन्य दोघांनी त्यांना हि संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

दरम्यान राज्याध्यक्ष पदाच्या स्पर्धेत नाशिक येथील अभय चोक्सी व पुणे येथील जगन्नाथ जगताप आदी दोन सदस्य होते.मात्र संघटनेसमोरील आगामी काळात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक धाडसी स्वभाव याचा विचार करून कोपरगाव येथील बिल्डर अनिल सोनवणे यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली असून अन्य दोघांनी त्यांना हि संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या पूर्वी हे पद सोलापूर येथील दत्ता मुळे यांचेकडे होते.मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचा कार्यकाळ संपला होता.सोनवणे हे येत्या ०१ एप्रिल २०२४ रोजी आपल्या पदाचा कार्यकाळ सुरु करणार आहे.

     सदर निवडीचे दिपक दरे,जगन्नाथ दिलीप,मच्छीन्द्र पागिरे,संग्राम देशमुख,नंदकिशोर माळवदे,मिलिंद वायकर,उदय मुंडे,अमोल कदम,योगेश गाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close