जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मंदिरातील दान पेटी फोडली,चोरट्यांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील दुष्काळी भागातील जागृत देवस्थान समजले जाणारे हनुमान मंदिराचा कडी कोयंडा तोडून त्यातील दान पेटी फोडून त्यातील सुमारे १२-१२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने कोपरगाव,शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान चोरटा तेथे असलेल्या सी.सी.टी.व्ही.त कैद झाला असल्याची माहिती आहे.

  

दरम्यान हि घटना तेथील चल चित्रणांत कैद झाली असून त्यात एक तिसीतील तरुण मंदिरात प्रवेश करताना दिसत असून त्याने अंगावर निळा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेला दिसत आहे.त्याने आधी मंदिरात प्रवेश करून हनुमान मंदिरात व आजूबाजूस कोणी नाही याची खात्री करून तेथील दानपेटी हातोड्याने ती फोडून त्यातील रोख रकमेसह आपल्या दुचाकीवरून पोबारा केला आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरटे मधून अधून डोके वर काढत असून कोपरगाव शहरात गतवर्षी सलग एका रात्रीत तीन कार चोरी गेल्याच्या घटनेचा तपास लागलेला नाही त्या शिवाय सुभद्रानगर येथील एका नागरिकांचे सुमारे पंच्याहत्तर हजारांची चोरी झालेली आहे.त्यानंतर पून्हा एकदा चोरट्यांनी आपले डोके वर काढले असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या माहेगाव येथील दत्त मंदिराची निवड करून थेट पोलीस यंत्रणा व राजकीय नेत्यांना गत वर्षी २० एप्रिल २०२३ रोजी आव्हान दिले होते.त्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना काल शनिवार दि.३० मार्च २०२४ रोजी रात्री ०९ ते आज सकाळी ६.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने जागृत समजल्या जाणाऱ्या हनुमान मंदिराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून त्यात प्रवेश करून आतील दानपेटी फोडली आहे.व त्यातील सुमारे १० ते १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
   दरम्यान हि घटना तेथील चल चित्रणांत कैद झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात एक तिसीतील तरुण मंदिरात प्रवेश करताना दिसत असून त्याने अंगावर निळा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेला दिसत आहे.त्याने आधी मंदिरात प्रवेश करून हनुमान मंदिरात उलट फेरा घालताना दिसत आहे.व परत सुलट फेरा घालताना दिसत असून आजूबाजूस कोणी नाही याची खात्री करून तेथील दान पेटी हातोड्या सारख्या हत्याराने घाव घालून ती फोडून त्यातील रोख रकमेसह आपल्या दुचाकीवरून पोबारा केला आहे.त्यामुळे रांजणगाव देशमुखसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे,

   दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक संदीप कोळी,फौजदार सागर काळे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महेश साहेबराव देशमुख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा २१६/२०२४ भा.द.वि.४५७,३८० प्रमाणे दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बाळासाहेब गोराणे हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close