जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखाना निवडणूक,शेतकरी संघटना सरसावली !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यास आज दि.१५ मे पासून सुरुवात झाली असून त्यासाठी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सरसावली असून आज त्यांच्या श्रीरामपूर कार्यालयात इच्छुकांनी आज मोठी गर्दी केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान शेतकरी संघटना माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात गटाच्या काँग्रेसशी व राष्ट्रवादीशी सहमती करणार की,अशोक सहकारी साखर कारखान्यासारखी स्वतंत्र निवडणूक लढवणार हे लवकरच समजणार आहे.मात्र याबाबत ते स्वतंत्र निवडणूक लढवतील असा कयास व्यक्त होत आहे.कारण नगर जिल्ह्यातील राजकारण घातकी असल्याने ते त्यास बळी पडणार नाही असे दिसते.त्यापेक्षा शेतकरी,कामगार हित जोपासणे व त्यांची संघटना वाढीवणे या साठी ते हे व्यासपीठ वापरतील असे दिसते.तर इकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे गटात या बाबत चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान अड्.अजित काळे यांनी आज गणेश सहकारी कारखाना वाचवू ईच्छित असललेल्या अन्य समविचारी कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेतल्या असल्याची खबर आहे.त्यासाठी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या सभासदांकडून अपॆक्षा वाढल्या आहेत.तर इकडे महसूल मंत्री विखे यांच्या गटात या निवडणुकीत नेहमी प्रमाणे संभ्रम नीती वापरण्याचे ठरवलेले दिसत आहे.

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच सहकार विभागाने जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यात दि.१५ मे पासून सुरुवात झाली असून ते भरण्याचा अखेरचा दिवस दि.१९ मे सकाळी ११ ते दुपारी ०३ पर्यंत असून आलेल्या अर्जाची छाननी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दि.२३ मे ते ०६ जून २०२३ पर्यंत दुपारी ०३ वाजे पर्यंत आहेत तर निवडणूक दि.१७ जून रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यँत संपन्न होणार असल्याची माहिती पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.बी.एल.खंडांगळे यांनी नुकतीच वृत्तपत्रात जाहीर केली आहे.त्यामुळे राजकीय क्षेत्रांतील इच्छुक नेत्यांनी आपल्या संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे.त्यासाठी शेतकरी संघटनेने त्यासाठी गेले अनेक दिवसापासून सुरुवात व ईच्छुकांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी या पूर्वीच अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक लढवली आहे.त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी मोठा प्रतिसाद दिल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी या वेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लक्षवेधी कामगिरी केली आहे.त्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीत सभासदांनाकडून मोठी अपेक्षा आहे.त्यामुळे त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात आपले भविष्य आजमविण्याचे ठरवलेले दिसत आहे.त्यानुसार त्यांनी राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान येथील सभागृहात व राहाता येथील एकनाथ मंगल कार्यालयात नुकतीच शेतकऱ्याच्या जनजागृती सभेचे आयोजन केले होते.त्यानंतर हि गणेश सहकारी कारखण्याची निवडणूक जाहीर झाली आहे.त्यानंतर त्यांच्या गोटात मोठी वर्दळ वाढली आहे.

त्यासाठी आज त्यांच्या कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व संभाजी नगर येथील उच्च न्यायालय वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अड्.अजित काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान त्यासाठी अड्.अजित काळे यांनी आज अन्य गणेश सहकारी कारखाना वाचवू ईच्छित असललेल्या समविचारी कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेतल्या असल्याची खबर आहे.त्यासाठी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या सभासदांकडून अपॆक्षा वाढल्या आहेत.तर इकडे महसूल मंत्री विखे यांच्या गटात या निवडणुकीत नेहमी प्रमाणे संभ्रम नीती वापरण्याचे ठरवलेले दिसत आहे.व “बाहेरचे काही काळ येणार व निघून जाणार” अशी आवई उठवली जाणार असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close