निवडणूक
बाजार समितीत अपात्र उमेदवारांना संधी,नगर येथे तक्रार दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना छाननीच्या वेळची एक गंभीर बाब समोर आली असून चारही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध हरकती घेतलेल्या नव्हत्या मात्र आता सत्ताधारी गटाचे तीन ते चार उमेदवार हे दोन पेक्षा जास्त अपत्य असलेले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे आता विरोधी गट काय भूमिका घेणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
“आपण या सत्ताधारी अपात्र उमेदवांराविरुद्ध सहकार विभागाच्या जिल्हा सहाय्यक निबंधक यांचेकडे लेखी तक्रार केली असून जिल्हा भरातील सर्व बाजार समित्यांच्या निवडणुकीत याबाबत स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून घेतले असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संबधीत अधिकाऱ्यांनी का लेखी घेतले नाही. याबाबत आपण पाठपुरावा करणार आहे”-नितीन शिंदे,जिल्हा सरचिटणीस,काँग्रेस,नगर जिल्हा.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अ.नगर जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीचा निडणुकांचा शिमगा नवीन वर्षात पेटला असून त्यांचा निवडणूक कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होऊन आता येत्या ३० एप्रिल रोजी मतदान संपन्न होत आहे.त्याबाबत नुकतीच माघार संपन्न झाली असून आता प्रचार शिगेला पोहचला आहे.सत्ताधारी गटाचे नेते या प्रचारातून गायब असले तरी त्यांनी आपल्या साजिंद्या मार्फत प्रचार सुरु ठेवला आहे.ते गावोगाव वैयक्तिक भेटी घेत काही ठिकाणी गाव बैठका होत आहे.दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ वाजता हा प्रचार बंद होणार आहे.मात्र या कालावधीत एक गंभीर बाब समोर आली आहे.
“सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक बाद होणाऱ्या उमेदवारांना संधी देऊन व पात्र उमेदवारांना डावलून आपली खेळी यशस्वी केली आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अडचण दूर केली असल्याचा आरोप केला आहे”-प्रमोद लबडे,अध्यक्ष,उत्तर नगर जिल्हा उद्धव सेना.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात सन-२००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात सुधारणा करण्यात आली होती.व त्यानुसार तीन किंवा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे.त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी निवडणूक आयोग करत आहे.नेमकी हीच बाब कोपरगाव बाजार समिती निवडणुकीत विरोधकांकडून विसरली गेली आहे.यावर आता पर्दापाश झाला आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने बाजार समितीचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”याबाबत तक्रारदारांनी छाननीच्या वेळीच हि हरकत घेणे गरजेचे होते आता हा विषय त्याच दिवशी संपला असून त्या बाबत संबंधितांना न्यायालयात आपले म्हणणे द्यावे लागेल” असे सूतोवाच केले आहे.
दरम्यान या निवडणुकीची २७ मार्च अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती,तर ३ एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती तर आलेल्या अर्जाची छाननी हि ५ एप्रिल संपन्न झाली होती.त्यात कोपरंगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज छाननीच्या दिवशी सर्वसंमतीने एकही अर्जावर हरकत घेतली नाही त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे १११ नामनिर्देशन पत्र तथा अर्ज,’जैसे थे’ ठेवल्याने कोणताही तंटा बखेडा निर्माण झाला नव्हता.मात्र आता प्रचारादरम्यान एक खुबी विरोधी गटाच्या हाती आली असून सत्ताधारी गटातील तीन ते चार उमेदवार हे दोन पेक्षा जास्त अपत्य असलेले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता विरोधी गट सेना उद्धव गट,काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,वंचित आघाडी हे काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत निवडणूक संपन्न होत आहे.तर मतमोजणी त्याच दिवशी कोपरगाव येथील पीपल्स सहकारी बँक सभागृहात ०५ ते संपेपर्यंत संपन्न होणार आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने बाजार समितीचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”याबाबत तक्रारदारांनी छाननीच्या वेळीच हि हरकत घेणे गरजेचे होते आता हा विषय त्याच दिवशी संपला असून त्या बाबत संबंधितांना न्यायालयात आपले म्हणणे द्यावे लागेल” असे सूतोवाच केले आहे.त्यामुळे हि लढाई निडणुकीनंतरही सुरु रहाणार असल्याचे दिसू लागले आहे.