निवडणूक
…या कृषी उत्पन्न बाजार समितीची छाननी संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व शेतकऱ्याची जीवनरेखा समजली जाणाऱ्या कोपरंगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज छाननीच्या दिवशी सर्वसंमतीने आज एकही अर्जावर हरकत घेतली नाही त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे १११ नामनिर्देशन पत्र तथा अर्ज,’ जैसे थे’ ठेवल्याने आता सभासदांचे आगामी २० एप्रिलच्या माघारीकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या साखर कारखान्यांच्या निवडणूका स्थानिक नेत्यांनी सभासदांना विश्वासात न घेता बिनविरोध काढल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची अच्छि-खांशी नाराजी आहे.त्यामुळे ते या निवडणुकीत मोठ्या जोमाने उतरले आहेत.तर या छोट्याशा निवडणूकित तालुक्यात विरोधकच शिल्लक न ठेवल्याने उगाच कोट्यावधीचा चुराडा करायचा हे काळे-कोल्हेना मान्य नाही अशी बातमी आहे.त्यामुळे कोणत्याही स्थितीत हि निवडणूक बिनविरोध काढायची असा त्यांनी चंग बांधला असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणारे कार्यकर्ते आपली नौका कशी पैल तिराला नेणार व आपले इसिप्त साध्य करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अ.नगर जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकीचा निडणुकांचा शिमगा नवीन हिंदू वर्षात पेटला असून त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दहा-बारा दिवस उलटले आहे.जिल्ह्यात दोन टप्प्यात बाजार समित्यांचा निवडणूका होत आहेत.कोविडच्या दोन लाटा आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणूका दोन वर्ष रखडल्या होत्या.दुसरीकडे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका,नगर परिषदाच्या निवडणूक पुढील अनिश्चित काळासाठी पुढे ढकल्या गेल्या आहेत.यामुळे कोपरगाव राहात्यासह सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आता आपले लक्ष बाजार समितीच्या निवडणुकीवर केंद्रीत केलेले आहे.यामुळे साहजिकच या सन-२०२३-२०२८ या कालावधीसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे.यात पारंपरिक आ.आशुतोष काळे सह माजी आ.स्नेहलता कोल्हे गट व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे हे पारंपरिक तीन गटासह शिवसेना (ठाकरे-शिंदे गट),निष्ठावान भाजप आमने-सामने राहतात की मागील वेळे प्रमाणे बिनविरोध लढणार हे लवकरच कळणार आहे.
दरम्यान आज नामनिर्देशन पत्र छाननीचा दिवस होता.मात्र यात सर्व संमतीने कोणीही कोणावर हरकत घेतली नाही त्यामुळे कोपरगावच्या (थोर) परंपरेप्रमाणे सर्वच्या सर्व नामनिर्देशन पत्र जैसे थे राहिले आहे त्यामुळे आता आगामी काळात राजकारणातील कलाकार समजले जाणारे पारंपरिक वैरी (?) काय कला करणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता दाखल झालेले अर्ज छाननी नंतर पुढीलप्रमाणे आहेत.
सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ-
सुधारक फकिरराव गाढवे,भगिरथ अनाजी होन,अशोक सोपान नवले,सर्जेराव चांगदेव कदम,भानुदास गोरखनाथ दहे,साहेबराव शिवराम लामखडे,साहेबराव किसन रोहोम,विष्णू नानासाहेब पवार,किरण मधुकर चांदगुडे,धनराज मनसुख पवार,लक्ष्मण विश्वनाथ शिंदे,राजेंद्र चांगदेव वैराळ,नामदेव खंडू जाधव,राहुल नेताजी गाडे,संजय पाराजी वडांगळे,पंडित यादवराव चांदगुडे,मधुकर निवृत्ती टेके,मिनानाथ पंढरीनाथ जोंधळे,मारुती यशवंत चौधरी,सुभाष निवृत्ती गाडे,विजय सुधाकर जाधव,पाटीलबा शहाजी वक्ते,रंगनाथ सोपान गव्हाणे,शिवाजी बापुराव देवकर,कैलास भिमा आसने,चैतन्य चंद्रशेखर कुलकर्णी,संजय माधवराव शिंदे,रावसाहेब चांगदेव टेके,गोवर्धन बाबासाहेब परजणे, देवराम रामभाऊ हेगडमल,देवराम तुकाराम गावंड,संजय वसंतराव रोहमारे,दादा आप्पा टुपके,शिवाजी बाबुराव पवार, राजेंद्र विठ्ठलराव पगारे,राहुल सुरेश गवळी,बाळासाहेब गंगाधर गोर्डे,अंबादास कारभारी पाटोळे,सुरेश मारुती जाधव, अमोल दिलीप गवळी,निखील रावसाहेब औताडे,कृष्णराव राधु सुंडे,आनंदराव देवराम जावळे,नितीन आबासाहेब पाचोरे आदीं लढवैयांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण-
संजय भागवत गुरसळ,शिवाजी कारभारी जाधव,साहेबराव शिवराम लामखडे,अश्विनी धनराज पवार,बाबासाहेब दत्तात्रय जगताप,संजय काशिनाथ दंडवते,पोपट परसराम गोर्डे,विक्रम बाबासाहेब सिनगर,भाऊपाटील रामचंद्र गुंजाळ,नितीन आबासाहेब पाचोरे,प्रकाश नामदेव गोर्डे,विष्णू एकनाथ पाडेकर,गोवर्धन बाबासाहेब परजणे,शिवाजी बापुराव देवकर,सचिन दादासाहेब गावंड,राजेंद्र शंकर निकोले आदींचा समावेश आहे.
सोसायटी महिला राखीव मतदारसंघ-
मीरा सर्जेराव कदम,हिराबाई रावसाहेब बारहाते,मंदाकिनी मधुकर टेके,मंगल भाऊसाहेब जोंधळे,विमल सुदाम भुसे, गयाबाई धर्मा जावळे,माधुरी विजय डांगे,जयश्री आनंदराव जावळे,शिला राजेंद्र वाकचौरे आदीं मान्यवर उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.
सोसायटी इतर मागासवर्ग मतदारसंघ-
गिरीधर दिनकर पवार,खंडू पुंजाबा फेपाळे,पंडितराव यादवराव चांदगुडे,बाळासाहेब रखमाजी राऊत,अनिल रघुनाथ बनकर,दत्ता नामदेव बिडवे,शरद रावसाहेब होन,रवींद्र अर्जुन रांधवणे आदी उमेदरवर रिंगणात अवतरले आहेत.
सोसायटी भटक्या जाती जमाती मतदारसंघ-
सोमनाथ यशवंत पारखे,रामदास भिकाजी केकान,जयराम रघुनाथ सांगळे आदी तीन उमेदवार आपली भाग्यरेखा तपासत आहे.
ग्रामपंचायत अनुसूचित जातीजमाती मतदारसंघ-
गोपाळराव भागवत सोनवणे,प्रभाकर रुंजाजी धिवर,रावसाहेब रंगनाथ मोकळ आदी तीन जणानी शड्डू ठोकले आहे.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ-
सुदाम विष्णू भुसे,अशोक सोपान नवले,राजेंद्र शंकर निकोले,रमेश तुकाराम नवले आदी चार जणांनी आपले राजकीय भविष्य अजमावण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यापारी-आडते मतदारसंघ-
सुनिलकुमार गोकुळचंद कोठारी,ललितकुमार तेजमल धाडीवाल (२अर्ज),ऋषिकेश मोहन सांगळे (२ अर्ज),संजय शामलाल भट्टड (२ अर्ज),मनिष जयंतीलाल शहा (२ अर्ज),सुनिलकुमार उत्तमचंद गंगवाल, नदीमअहमद रियाज अहमद खान,धरमकुमार माणिकलाल बाबरेचा (२ अर्ज), पुंडलिक पुंजाबा चक्के,संतोष मंगलदास ठक्कर,रेवननाथ श्रीरंग निकम,शिवाजी माणिक शेळके आदींनी रणात उडी घेतली आहे.
हमाल-मापाडी मतदारसंघ-
भाऊसाहेब बाबुराव शेळके (२अर्ज),जलदिप भाऊसाहेब शेळक (२ अर्ज),अर्जुन भगवान मरसाळे,रामचंद्र नामदेव साळुंके,विनोद दगडू सांगळे आदी आपली हस्तरेखा तपासात आहे.
दरम्यान गेली तीन पंचवार्षिक निवडणुका काळे-कोल्हे,परजणे,वहाडणे गटांनी,”शेतकऱ्यांची संस्था नुकसानीत नको” या लोभस नावाखाली बिनविरोध केल्या आहेत. आपले उखळ पांढरे केले आहे.यावेळी तर तालुक्यात खासगी बाजार समित्या सुरु करण्यासाठी साठी नेत्यांनी व त्यांच्या साजिद्यांनी मोठी स्पर्धा सुरु ठेवली असल्याने या निवडणुकीकडे स्थानिक नेते शेतकरी संस्थेचे किती हितस सांभाळणार याकडे राजकिय निरीक्षक,स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार यांचे लक्ष लागून आहे.