जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

कोपरगावातील…या विद्यार्थ्यांचा परदेश दौरा,उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असललेल्या समता इंटरनॅशनल स्कूलने इजिप्त मधील एसीआयसी अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलसोबत सांस्कृतिक व शैक्षणिक देवाण-घेवाण करत ऐतिहासिक करार करण्यात यश मिळविले असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी दिली आहे.

पुरातन काळातील जे सात आश्चर्य मानले जातात त्यापैकी एकमेव अस्तिवात असलेले हे गीझाचे भव्य पिरॅमिड इजिप्तची राजधानी कैरोजवळ आहे. गीझाचे हे भव्य पिरॅमिड आजही प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची साक्ष देत उभा आहे.इजिप्तचे पिरॅमिडस् सर्व जगात प्रसिद्ध आहेत.या पिरॅमिडस् अणि त्यामधील ममी (ममी कुजू नये म्हणून विशिष्ट रसायने भरून ठेवलेले प्रेत) यांबद्दल सर्व जगालाच कुतूहल वाटते.पिरॅमिडची रहस्यमय गूढता अजूनही कमी झालेली नाही.जगातील संशोधक आजही पिरॅमिड,इजिप्तची संस्कृती याबाबत संशोधन करत आहेत.या संशोधनातून इजिप्तची संस्कृती,राजे त्यांनी बांधलेले पिरॅमिडस् याबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे.त्यासाठी समता स्कुलची हि सहल आयोजित करण्यात आली होती.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इजिप्त या प्राचीन महत्व असणाऱ्या देशाला व आधुनिकतेकडे कल असलेल्या दुबई या देशाला एकत्रित रित्या २६ मार्च ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान भेट दिली आहे.त्या परतीच्या प्रवासानंतर त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी समताचे विद्यार्थी ईशान कोयटे,देशना अजमेरा,माही संचेती,अर्णा कुंकूलोळ,भक्ती न्याती आदीसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे त्या म्हणाल्या की,”समता इंटरनॅशनल स्कूल’ हे विद्यालय कोपरगाव,वैजापूर,येवला तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात नामांकित म्हणून ओळखले जाते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने अभ्यासक्रमासह वेगवेगळ्या योजना,उपक्रम राबवत असतात.त्या साठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलींचे आयोजन करत असते.त्यामुळे समता संकुल विद्यार्थ्यांना शैक्षणिक,ऐतिहासिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक,आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असते.आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहली हा त्याचा एक भाग मानला जात आहे.

इजिप्सियन शाळांना भेट दिली असता भारतीय शाळांमधील शैक्षणिक धोरण आणि इजिप्सियन शाळांमधील शैक्षणिक धोरण याबाबत चर्चा केली.तसेच जगातील सात आश्चर्यांपैकी जग प्रसिध्द पिरॅमिड,स्फिंक्स व्हॅली,इजिप्तला समृद्ध करणारी जगातील सर्वात लांब नाईल नदी,मोतांजा पॅलेस,काटा कॉम ऑफ एल शोकाफा,जगातील सर्वात मोठी अलेक्झांड्रिया ग्रंथालय,इजिप्त मधील संग्रहालय या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली.तर दुबई शहराची सहल करताना शहरातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती घेत दुबईतील अल बुर्ज खलिफा,ग्लोबल व्हिलेज,मिरॅकल गार्डन,एक्वेरियम,फाऊंटन शो अनुभवला असून अबुधाबी फेरारी वर्ल्डला भेट देऊन तेथील सहलीचा त्यांनी आनंद घेतला असल्याची माहिती स्वाती कोयटे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close