जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक लढवा-…या गटाची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,व बाजार समितीची आगामी काळात येणारी निवडणुक लढविण्याची मागणी बहुसंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत केली आहे.

आगामी विविध निवडणुकात प्रथम दर्शनी मित्रपक्षांसोबत सल्ला मसलत करून चाचपणी करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील स्पष्ट दिशा ठरविण्यात येणार आहे.गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व प्रकारच्या अडचणी-अडथळे यांना तोंड देत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये संपन्न झाली होती.या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने म्हणजे राज्यात सर्वात मोठ्या मताधिक्याने विजय वहाडणे याना येथील मतदारांनी निवडुन दिले होते.तर २८जागांपैकी कोल्हे गट भाजप-शिवसेना यांना वीस जागा प्राप्त झाल्या होत्या.तर आ.आशुतोष काळे गटास सात जागा तर एक अपक्ष नगरसेवक निवडून दिला होता.या निवडणुकीत वहाडणे गटाने नगरसेवक पदाच्या जागा लढवल्या नाही ही मोठी राजकीय चूक ठरली होती.त्यामुळे त्यांना पाचही वर्ष कोल्हे,काळे गटाच्या नगरसेवकांचे पाय चेपण्याचा अनास्था प्रसंग ओढवला होता.त्यामुळे नगराध्यक्ष वहाडणे यांना पायातील बेड्यासह काम करणे मोठे जिकरीचे बनले होते.तरीही त्यांनी ही खिंड मोठ्या जोखमीसह यशस्वीपणे लढवली असल्याचे मानले जात असून आता त्यांच्यासह सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना आगामी निवडणुकीचे वेध लागले आहे.या पार्श्वभूमीवर विविध भूमीपुजने, उदघाटने,कार्यकर्त्यांचे मेळावे आदींना स्वाभाविकपणे उत आला आहे.त्याला वहाडणे गटही अपवाद नाही.त्यांनी नुकतीच कोपरगावात आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ भाजप नेते रामदास खैरे हे होते.त्यावेळी ही भूमिका वहाडणे गटाच्या वतीने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी तालुकाध्यक्ष वाल्मिकराव भोकरे,सतिश कृष्णानी,नामदेवराव जाधव,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,सुभाष दवंगे, संजय कांबळे,नवनाथ जाधव,प्रभाकर वाणी,रविंद्र बागरेचा,विनीत वाडेकर,छनूदास वैष्णव,भाऊसाहेब कासार,प्रमोद पाटील सर,नंदू जोशी,कैलास सिनगर,राजेंद्र खैरे,मुकुंद कालकुंद्री,संजय कानडे,योगेश वाणी,किरण थोरात,धनू परदेशी,संजय कांबळे,अविनाश पानगव्हाणे,प्रविण बागरेचा,बडजाते, वायखिंडे,उदावंत,वसंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या (वसंत स्मृती कार्यालय) जेष्ठ नेत्यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा-विनिमय केल्यानंतर आगामी नगरपरिषद,मार्केट कमिटी,जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान आगामी निवडणुकात प्रथम दर्शनी मित्रपक्षांसोबत सल्ला मसलत करून चाचपणी करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील स्पष्ट दिशा ठरविण्यात येणार आहे.गेल्या पाच वर्षात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व प्रकारच्या अडचणी-अडथळे यांना तोंड देत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्याच कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.

या बैठकीचे प्रास्तविक माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन सुभाष दवंगे यांनी केले तर उपस्थितांना नामदेवराव जाधव,वाल्मिकराव भोकरे,सतिश कृष्णानी,प्रमोद पाटील सर आदींनी मार्गदर्शन केले त्यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.उपस्थितांचे माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close