जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिवादन केले आहे.तर कोपरगांव येथील नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी डॉ.आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन केले आहे तर शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत अभिवादन करण्यात आले आहे.

६ डिसेंबर या दिवस महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो.या दिवशी मुंबईतील चैत्यभूमी येथे देश-विदेशातून लाखो आंबेडकर अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात.महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबांचे मौलिक विचार घेऊन जात असतात.त्या निमित्त देशभर या महामानवाला अभिवादन करण्यात येत असते ते कोपरगाव शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले आहे.

या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,मेहमूद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,दिनकर खरे,फकीर कुरेशी,प्रकाश दुशिंग,रावसाहेब साठे,राजेंद्र खैरनार,वाल्मिक लहिरे,आकाश डागा,संतोष बारसे,मनोज नरोडे,नितीन शिंदे,बाळासाहेब पवार,किरण बागुल,शंकर घोडेराव,विजय त्रिभुवन,राजु विघे,राहुल खंडिझोड,मनोज शिंदे,संजय दुशिंग,रोशन शेजवळ,लक्ष्मण सताळे,मायादेवी खरे,मीराताई साळवे, कु.दिप्ती रणशूर आदीं मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान शहरातील श्री.गो.विदयालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे जेष्ठ शिक्षक आर.बी.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन अनिल काले यांनी तर आभार अनिल अमृतकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,आर.आर.लकारे,ए.जे.कोताडे,के.एस.गोसावी,डी.पी.कुडके,वाय.के.गवळे,बी.सी.उल्हारे,बी.बी.कुळधरण आदी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close