जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील..या ग्रामपंचायतीत चुलती आणि पुतण्याचे राज्य !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच मोठ्या उत्साहात बिनविरोध पार पडली असून त्यात शिवसेनेचे डाऊच गावचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत गुरसळ यांच्या धर्मपत्नी प्रमिला गुरसळ यांची एक वर्षांसाठी निवड झाली आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.विशेष म्हणजे नूतन उपसरपंच यांचे पुतणेच सरपंच असल्याने आता पंचायतीचा कारभार पुतणे आणि चुलती यांच्या हातात आला आहे.

डाऊच खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक सन-२०१७ साली संपन्न झाली होती.त्यात लोकनियुक्त सरपंच म्हणून संजय गुरसळ यांची निवड झाली होती.त्याच वेळी सदस्य म्हणून सरपंच गुरसळ यांच्या चुलती प्रमिला गुरसळ यांचीही योगायोगाने निवड झाली होती.दरम्यान उपसरपंच पदाची निवड आवर्तन पद्धतीने ठरविली होती त्यात आता सरपंच संजय गुरसळ यांच्या चुलती प्रमिला गुरसळ यांची निवड झाल्याने तालुक्यात हा औत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरला आहे.

डाऊच खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक सन-२०१७ साली संपन्न झाली होती.त्यात लोकनियुक्त सरपंच म्हणून संजय गुरसळ यांची निवड झाली होती.त्याच वेळी सदस्य म्हणून सरपंच गुरसळ यांच्या चुलती प्रमिला गुरसळ यांचीही योगायोगाने निवड झाली होती.तिची मुदत आगामी वर्षात ऑक्टोबर २०२२ सालात संपत आहे.त्यात नऊ सदस्यांची निवड करण्यात आली होती.सरपंच हे पद दहावे होते.दरम्यान उपसरपंच पदाची निवड आवर्तन पद्धतीने ठरविली होती.त्यात गत वर्षी स्वाती गजानन रणधीर यांची निवड करण्यात आली होती.त्याची मुदत गत महिन्यात संपली होती.त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा सरपंच संजय गुरसळ यांचेकडे सोपवला होता.त्यामुळे रिक्त जागी निवड करण्याची निकड निर्माण झाली होती.

त्या बाबत ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी हि निवड प्रक्रिया जाहीर केली होती.त्यानुसार या जागेसाठी सरपंच गुरसळ यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक नुकतीच घेण्यात आली होती.त्या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला गुरसळ यांचा एकमेव अर्ज या पदासाठी आला होता.त्या मुळे त्यांची निवड सरपंच संजय गुरसळ यांनी बिनविरोध जाहीर केली आहे.त्यांच्या निवडीचे सरपंच संजय गुरसळ,यांचेसह सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पवार,सलीम सय्यद,मनुताई पवार,वंदना पीठे,स्वाती रणधीर,सूर्यभान जाधव,शफिक सय्यद,बाळासाहेब गुरसळ,सुनील गुरसळ,बालम सय्यद,मच्छिंद्र गुरसळ,बाबासाहेब गुरसळ,दादाभाऊ गुरसळ,रावसाहेब पवार,बाबासाहेब पवार,दादाभाई सय्यद,अर्जुन होन,मुन्नाभाई सय्यद,गणेश रणधीर,मेहबूब सय्यद आदी मान्यवर हजर होते.
सदर निवडीला निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी काम पहिले तर मान्यवरांचे देवा पवार यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close