जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात भाजपची सरशी,१९ ग्रामपंचायतीवर वरचष्मा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीत सांगवी भुसार ग्रामपंचायत वगळता २८ ग्रामपंचायतीं पैकी १९ वीस ग्रामपंचायतीवर भाजपने वरचष्मा स्थापित केला असून विद्यमान आ.आशुतोष काळे यांना सात ठिकाणच्या ग्रामपंचायती राखता आल्या आहेत मात्र कोकमठाण सारखी मोठी ग्रामपंचायत मोठ्या मताधिक्क्याने भाजपकडून आ.काळे गटासह सेनेने खेचून आणली आहे.तर संवत्सर ग्रामपंचायत परजने गटाने सतरा पैकी १४ जागांनी जिंकली असून भाजपला दोन तर काळे गटाला एक जागा मिळवून चंचू प्रवेश करता आला आहे.विजयी ग्रामपंचायतीत भाजपास २७९ पैकी १४४ ठिकाणी तर राष्ट्रवादीस ११२ ठिकाणी तर परजणे गटास २० तर अपक्षास ०३ जागा मिळाल्या आहेत.विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान कोकमठाण ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपने मोठी प्रतिष्ठा पणाला लावूनही त्या ठिकाणी बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे.मात्र या ठिकाणी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम हे शिवसेनेला बरोबर घेऊन आपल्या गटाला विजयी करण्यात यशस्वी झाले असल्याने त्यांचे वजन वाढले आहे.

कोपरगाव पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली दरम्यान काही विश्रांतीतीच्या क्षणी आपली पोट पूजाही केली त्याचे छाया चित्र.

राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे १५ तारखेला प्रत्यक्षात १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.गडचिरोली जिल्ह्यात २२ जानेवारी २०२१ रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत १८ जानेवारी रोजी मतमोजणी संपन्न झाली आहे.
१५ तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या ०१ लाख १२ हजार ७०९ जागांसाठी एकूण ०३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर ०२ लाख ४१ हजार ५९८ उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी २६ हजार ७१८ उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे अंतिमत: ०२ लाख १४ हजार ८८० उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले होते.त्याचे निकाल आज अकरा वाजेच्या सुमारास २९ टेबलद्वारे निवडणूक अधिकारी योगेश चन्द्रे यांनी जाहीर केले आहे.त्यात खालील ग्रामपंचायतीत कोणाला किती जागा आल्या आहेत ते दर्शवले आहे ते पुढील प्रमाणे दर्शवले आहे आधी ग्रामपंचायतीचे नाव एकूण जागा व पुढे निवडणूक आलेल्या जागा राष्ट्रवादी व भाजप दर्शवले आहे.

कोळगाव थंडी एकूण जागा ९-७-२,जेऊर कुंभारी १०-३-७,सोनारी-७-३-४,वेळापूर-१०-४-६,ओगदी-७-३-४,आपेगाव-७-००-००,अंचलगाव-७-१-६,कासली ९-४-४-१(मयत),नाटेगाव-९ -२-७,उक्कडगाव ९-४-५,मनेगाव ७-२-५,मायगाव देवी-९-९-०,मळेगाव थडी-९-१-८,अंजनापूर-७-३-४,मढी बु.-९-३-६,रवांदे-१३-३-१०,सांगवी भुसार-बिनविरोध (परजने-जाधव),मढी बु.-९-५-४,देर्डे चांदवड-९-२-७,धोंडेवाडी-७-२-५,जेऊर पाटोदा-११-५-६,हिंगणी-७-५-२,येसगाव-११-२-९,टाकळी-१३-५-८,संवत्सर-१७-१-२-१४(परजने),कोकमठाण -१७-१५-२,तीळवणी-७-७-०,काकडी-११-३-८,आदींचा समावेश आहे.

दरम्यान या निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांच्या विरोधात बऱ्याच ग्रामपंचायती गेल्या असून मागच्या वेळी आ.काळे गटाला १८ ग्रामपंचायती मिळाल्या होत्या मात्र यावेळी तब्बल ११ ग्रामपंचायती गमवाव्या लागल्या असून भाजपला तेवढ्याच ग्रामपंचायतींचा फायदा झाला असून दर विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी गटाच्या विरोधात ग्रामपंचायतींचा कौल जातो या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी पाहायला मिळाली आहे.मात्र यावेळी काळे गटाचा बाले किल्ला असलेली काकडी ग्रामपंचायत भाजपने काढुन घेतल्याने आश्चर्य मानले जात आहे.

नगर जिल्हयाचे लक्ष लागून असलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य व गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने यांनी १७ पैकी १४ जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.येथे माजी आ.कोल्हे गटाने मोठी आर्थिक शक्ती पणाला लावली होती तेथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब बारहाते व कोल्हे सहकारी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे हे दोघेही परजणे गटाचे माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभूत केले असून प्रभाग क्रमांक एक व चार मध्ये सर्व प्रतिष्ठा पणाला लावूनही पराभव पत्करावा लागला असला तरी भाजपला दोन जागा मिळविण्यात यश मिळाले आहे त्यातील एक जागा ही अवघ्या दोन मतांनी विजयी झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close