जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

नव तरुणांनी राजकारणात यावे-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नवीन पिढीतील तरुणांनी समाज कारणाबरोबरच राजकारणात येऊन त्यातील अनिष्ठ प्रथा बंद करून नवविचार आगामी काळात देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मालेगाव महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेच्या स्थाई समितीच्या सभापतीपदि राजाराम जाधव यांची निवड झाल्याबद्दल राज्य श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने नुकताच सत्कार सोहळा संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सभापती राजाराम जाधव हे संघर्षमय जिवन जगत आज या पदावर पोहचले आहेत.त्यांचा जिवनप्रवास हा युवकांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे.शिवसेनेचा कार्यकर्ता ते स्थाई समिती सभापती पद हा पल्ला गाठत असतांना त्यांनी खुप संघर्ष केलेला आहे-सचिन गुलदगड,श्री संत सावता माळी संघ

त्याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी जाधव साहेबांचा शाल,श्रीफळ, बुके देऊन सत्कार केला.त्यावेळी नगर-नाशिक जिल्हा संघटक संपतराव जगझाप,चेतन जगझाप,राजेंन्द्र मोकळ,पियुष जाधव,जेतन्द्र जाधव,किशोर जाधव शिवसेना कार्यकर्ते तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गुलदगड म्हणाले कि,”राजाराम जाधव हे संघर्षमय जिवन जगत आज या पदावर पोहचले आहेत.त्यांचा जिवनप्रवास हा युवकांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे.शिवसेनेचा कार्यकर्ता ते स्थाई समिती सभापती पद हा पल्ला गाठत असतांना त्यांनी खुप संघर्ष केलेला आहे.
या वेळी राजाराम जाधव म्हणाले की,”गेल्या ४० वर्षांपासुन शिवसेनेचे काम करत असतांना नेहमी समाजकारण करण्यास अग्रक्रम दिला आहे.मालेगावमधील कुठलाही नागरीक अडचणीत असेल तर आम्ही तत्परतेने हजर राहुन त्याची अडचण सोडवतो.२४ तास ३६५ दिवस मला कधीही फोन केला तरीही गेल्या ४० वर्षापासुन मालेगावकरांच्या सेवेत हजर आहे.तरुणांनी समाजकारणाबरोबरच राजकारणात यावे असेही प्रतिपादन त्यावेळी त्यांनी केले आहे.पुढे बोलतांना महाले की,आज राजकारणांत तरुणांची,नव्या पिढीची गरज आहे.राजकारणात आल्यास समाजाची सेवा अधिक ताकदीने आपण करु शकतो असाही विश्वास यावेळी जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी संघाचे व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मालेगाव मधील विवीध संघटनांच्या वतीने जाधव व गुलदगड यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close