निवडणूक
शिर्डी लोकसभेची उमेदवारी…या नेत्यास द्या-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातिभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,माजी जिल्हा परिषद सदस्य यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी द्यावी लोकसभेचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मागणी केली असल्याची माहिती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“अ.नगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातिभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्यावर घराणेशाहीचा ठपका नसून त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य पद भूषवले आहे.त्यांनाच यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी”-नितीन शिंदे,सरचिटणीस,प्रदेश काँग्रेस,
आज शिर्डी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक लोकनेते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री व अ.नगर जिल्हा शिर्डी व दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थित संगमनेर येथे मोठया उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी हा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे व शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड यांचा अ.नगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,आ.लहू कानडे,शिर्डी लोकसभेचे समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,माजी नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे,ज्ञानदेव वाफारे,राहाता विधानसभा काँग्रेसचे नेते सुरेश थोरात,संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व विभागातील पदाधिकारी व काँग्रेसजन बहुसंख्येने उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक चंद्रकांत हडोरे,तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडे घराणेशाहीचा ठप्पा नसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य यांना अ.नगर जिल्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे नितीन शिंदे यांनी वाघमारे यांना शिर्डी लोकसभेचे उमेदवारी मिळावी अशी सर्वांच्या वतीने मागणी केली,या मागणीला पाठिंबा भटक्या विमुक्त काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहिदास चव्हाण,अनुसूचित काँग्रेसचे प्रदेश महासचिव बंटी यादव,निराधार निराश्रित काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शाहीर रेवणनाथ देशमुख,निराधार निराश्रित काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई उनवणे,सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर कडू आदी उपस्थित होते.