निधन वार्ता
पत्रकार वाकचौरे यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथील दैनिक पुढारीचे वरिष्ठ उपसंपादक चंद्रकांत सरुनाथ वाकचौरे यांच्या मातोश्री कांताबाई सरुनाथ वाकचौरे (वय-७८वर्ष) यांचे आज सकाळी ९.३५ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान स्व.कांताबाई वाकचौरे या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणूंन परिसरात परिचित होत्या.त्यांचा अंत्यविधी आज रोजी दुपारी ०३.३० वाजता राहाता तालुक्यातील नांदूर येथील स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.