जाहिरात-9423439946
नदी प्रदूषण

मैला मिश्रित गोदापात्रात देवमूर्तींचे विसर्जन नको-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

मैला मिश्रित प्रदूषित झालेल्या गोदावरी नदी पात्रात नागरिकांनी गणपती व देवी मूर्तीचे विसर्जन करायचे का ? असा तिखट सवाल गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देत केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वर्तमानात गोदावरी पवित्र नदी प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर अपवित्र झाली आहे.या नदीत नाशिक,कोपरगाव सह विविध शहरांच्या गटारी थेट सोडल्या आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.या पूर्वी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी या नदीतील मासे सन-२०१५ साली मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याने आमच्या प्रतिनिधीने गावकरी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवला होता त्या नंतर हा प्रश्न आदिनाथ ढाकणे यांनी उठवला आहे.

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते.या नदीला,’दक्षिण गंगा’ असे ही म्हटले जाते.गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर आहे.गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो.साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.दारणा,प्रवरा,वैनगंगा,मांजरा आदी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते.त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.वर्तमानात हि पवित्र नदी प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर अपवित्र झाली आहे.या नदीत नाशिक,कोपरगाव सह विविध शहरांच्या गटारी थेट सोडल्या आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या आहेत हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

दरम्यान या पूर्वी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी या नदीतील मासे सन-२०१५ साली मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याने गावकरी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवला होता.त्याच वेळी एक प्रदूषण मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता.त्यात जायकवाडी धरणातील पाणीही पिण्यायोग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला होंता.यात विशेषत्वाने वरील सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर आपले दूषित पाणी सोडत असल्याचे दिसून आले होते.मात्र त्याकडे सर्वच राजकीय पक्षानीं सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.त्यानंतर या विषयाकडे लक्ष वेधले आहे ते कोपरगाव येथील तरुण कार्यकर्ते व गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी.त्यांनी हा विषय सातत्याने लावून धरला आहे.मात्र मतांसाठी सोयीचा नसल्याने राजकीय नेतृत्वाने या गंभीर विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे हे वेगळे सांगणे न लगे.मात्र हा इतका विषय इतका गंभीर आहे की,भविष्यात गोदावरी काठी लोकवस्ती असलेल्या नागरिकांनीं याकडे वेळीच लक्ष वेधले नाही तर पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्कर ठरणार आहे.

या महत्वाच्या विषयाकडे वर्तमानात आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगावचे तहसीलदार बोरुडे यांना निवेदन देऊळ लक्ष वेधले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातून दक्षिणगंगा म्हणून समजली जाणारी पवित्र अशी गोदावरी नदी वाहते,परंतु गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे पवित्र अशा गोदावरी नदीपात्रात कोपरगाव शहरातील सर्वच गटारीचे मैला मिश्रीत पाणी जाऊन मिळते तसेच कोपरगाव शहरात सुरू असणाऱ्या अवैध कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जनावरांच्या कत्तलीमुळे त्यांच्या रक्ताचे झरे व मांसाचे तुकडे देखील या गटारीच्या पाण्यात मिसळत आहे.

आगामी काळात गणेशोत्सव असून त्यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने एक बैठक बोलावली होती.त्यातही हा विषय त्यांनी ऐरणीवर आणला आहे.व या प्रदूषित झालेल्या गोदावरी नदी पात्रात कोपरगाव शहरातील नागरिकांनी तोंडावर आलेल्या गणेश उत्सवाच्या काळात १० दिवस मनोभावे पूजा-आरती करत स्थापन केलेल्या श्री गणेशाची देवी मातेची पवित्र मूर्ती विसर्जित करायची का असा रास्त सवाल विचारला आहे.

तसेच जर प्रशासनाने अथवा कोपरगाव नगरपालिकेने येणाऱ्या गणेश उत्सव व नवरात्र उत्सव निमित्त घराघरामध्ये स्थापन होणाऱ्या श्री गणेश व देवी मूर्तीचे विसर्जन करण्याकरता काहीतरी व्यवस्था करावी तसेच कोपरगाव शहरातून वेगवेगळ्या गटारी मार्फत गोदावरी नदीपात्रात जाणारे मैला मिश्रीत पाणी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या,अन्यथा गणपती विसर्जनाच्या व देवी मूर्ती विसर्जनाच्या दिवशी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने गोदावरी नदीकिनारी प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा ढाकणे यांनी शेवटी दिला आहे.

ढाकणे यांनी सदर निवेदनाची प्रती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे यांनाही दिली आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देखील ई-मेल करत सदर निवेदन पाठवले आहे.आता ढाकणे यांच्या या भूमिकेवर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close