दुष्काळ
माजी आमदारांचे वरातीमागून घोडे…यांची टीका

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना उशिरा झोपेतून जाग आली असून त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी दुष्काळी जनतेचा कळवळा दाखवण्यास सुरुवात केली असल्याची टिका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

अ.नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे.सुरूवातीला जून महिन्यात पावसाने अवकृपा केली.जुलैमध्ये पेरणीसाठी पाऊस झाला तेवढया पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली त्यानंतर मात्र तो गायब झाला.त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले.बहुतांशी हवामान तज्ज्ञ पावसाने खोटे ठरवले आहे.मधील काळात पावसाचा मोठा पडलेला खंड खरीप पिकांच्या मुळावर आला आहे.अ.नगर जिल्ह्यात सुमारे सरासरी क्षेत्र ०५ लाख ७९ हजार ७६८ हे.असून त्यातील ०४ लाख ८५ हजार ०६९ क्षेत्रावर पेरणी झाली असून सरासरी ती ८४ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे खरीप क्षेत्र ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले असून सोयाबीन पिकाने मान टाकली आहे.सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी आदी पिके पावसापाण्याअभावी खाक झाली आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात राजकारणाचे आणि टिकटिपणीचे मात्र जोमात खरीप पीक आले असून माजी आ.कोल्हे यांनीं नुकतीच आ.आशुतोष काळे यांचेवर टिका केली होती या पार्श्वभूमीवर आ.काळे गटाकडुन त्या टिकेला एका प्रसिद्धी पत्रकान्वये उत्तर मिळाले आहे.
त्यांनी त्यात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार याची पूर्वकल्पना येताच आ.काळे यांनी मागील एक महिन्यापासून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालक मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्वच विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून मतदार संघात दुष्काळाची पाहणी करण्यापासून ते शेतकऱ्यांना आगावू पिक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे.मतदार संघात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावतळे भरून देणे,टँकरची मागणी,जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्याबाबत योग्य कार्यवाही सुरु आहे.मतदार संघातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत मतदार संघाची तातडीने आढावा बैठक घ्यावी अशी मागणी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली होती.परंतु त्याच दिवशी पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक आयोजित केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यावेळी आ.काळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे मतदार संघातील खरीप पिकांचे पावसाअभावी होत असलेल्या नुकसानी बाबत परिस्थिती मांडून खरीप पिकांना तातडीने आवर्तन सोडावे यासाठी आग्रह धरला होता. त्याची दखल घेवून गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन सुरु आहे.
यावरच न थांबता पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे नियमानुसार शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली आहे.त्याबाबत देखील सातत्याने पाठपुरावा सुरु असून नुकसान भरपाई देण्याबाबतचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश दोनच दिवसात निघणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे याला कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नाही.त्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना दुष्काळाच्या सोयी सवलतीचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी आ.आशुतोष काळे प्रयत्न करीत आहे.
“ज्या शेतकऱ्यांना २०१९ पूर्वी अडीच किलोमीटर पर्यंतच पाणी मिळत होते काही शेतकऱ्यांना तर ते देखील मिळत नव्हते मात्र २०१९ पासून सर्वच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत आहे.मात्र राजकीय आकसापोटी आपल्या कार्यकाळात केलेल्या चुकांवर पांघरून घालून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांचा सुरु असलेला आटापिटा हा वरातीमागून मागून घोडे असा प्रकार असल्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी शेवटी म्हटले आहे.
“सन-२०१४ साली लाटेवर निवडून आलेल्या माजी आ.कोल्हे या पाच वर्ष हवेतच होत्या.गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना पाच वर्षात एकाही विद्युत उपकेंद्राची निर्मिती करू शकल्या नाही.माजी आ.अशोक काळे यांना श्रेय मिळू नये यासाठी कोळपेवाडी येथे होणारे १३२ के.व्ही.चे सबस्टेशन सिन्नर तालुक्यात शहा येथे पिटाळून लावले.त्या शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र देवू शकल्या नाही,विजेसह शेतीपाण्याचा एकही प्रश्न माजी त्या सोडवू शकल्या नाहीत”-सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष कर्मवीर काळे सहकारी कारखाना.