जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसिंचन

निळवंडे कालव्यांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणार-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांची कामे वेगाने सुरु आहेत २०२२ अखेर दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोलताना दिले आहे.त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गत ५१ वर्षांपासून प्रलंबित असलेला निळवंडे प्रकल्पाचा लढा निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावर लढताना उच्च न्यायालयात नेला त्यामुळे निळवंडे कालव्यांत बसलेले राजकीय शुक्राचार्यांना बाहेर काढणे सोपे गेले व त्यांचे या प्रकल्पाबाबत मागे फिरण्याचे दोर कापले गेल्याने हा प्रकल्प कोरोना काळातही सुरु ठेवावा लागला.यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेली सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात माजी खा.प्रसाद तनपुरे व त्यांचे सुपुत्र ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उजळली आहे.

निळवंडे कालव्याच्या मंजुरीस जवळपास ५१ वर्षाचा कालखंड उलटला आहे.मात्र अद्यापही कालव्याचे काम संपलेले नाही.धरणाचे काम पूर्ण होऊन तेरा वर्षाचा कालखंड उलटत आला आहे.कालव्याचे काम त्या बरोबरीने होणे गरजेचे होते.मात्र त्याला उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय धुरिणांनी सविस्तर बगल दिली होती.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने हा लढा रस्त्यावर लढताना उच्च न्यायालयात नेला त्यामुळे निळवंडे कालव्यांत बसलेले राजकीय शुक्राचार्यांना बाहेर काढणे सोपे गेले व त्यांचे या प्रकल्पाबाबत मागे फिरण्याचे दोर कापले गेल्याने हा प्रकल्प कोरोना काळातही सुरु ठेवावा लागला.यात निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात माजी खा.प्रसाद तनपुरे व त्यांचे सुपुत्र ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.मात्र उजव्या कालव्याचे काम की.मी.३५ ते ९५ या कालव्याचे कामास तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया अद्याप सुरु झाली नव्हती.या खेरीज घुलेवाडी,व निळवंडे ता.संगमनेर येथील भूसंपादन व नगर-मनमाड,व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम रखडले होते.या कडे माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले होते.व त्या बाबत त्यांना तातडीची बैठक घ्यायला लावून या कामावर समक्ष भेट देण्याचा आग्रह धरला होता.त्या नुसार आज राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे निळवंडे उजव्या कालव्याच्या कामाची अचानक पाहणी प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते.

सदर प्रसंगी माजी खा.प्रसाद तनपुरे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,जलसंपदाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे,निळवंडेचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक,अलका अहिरराव,कार्यकारी अभियंता गिरीश संघानी, ‘मुळा’ च्या कार्यकारी अभियंता सायली पाटील नगर पाटबंधारेचे कार्यकारी अधिकारी गणेश नान्नोर,लघू पाटबंधारे संगमनेरच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप,मध्यम प्रकल्प,नगरचे कार्यकारी अभियंता काशिनाथ मासाळ,निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष सोन्याबापू उऱ्हे सर,ज्ञानदेव पाटील हारदे,गोरक्षनाथ शिंदे,माजी अभियंता चंद्रकांत मुसमाडे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले,”राहुरी तालुक्यातील निळवंडे उजव्या कालव्याच्या शेवटच्या भागातील कामाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल.निळवंडे कालव्यांच्या कामासाठी यंदा सर्वाधिक ४९१ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.त्याप्रमाणे कामे वेगाने चालू आहेत.ती पूर्ण झाल्यावर चालू वर्षाअखेर आणखी सव्वाशे ते दीडशे कोटी रुपये देण्याचे नियोजन आहे.ऑक्टोंबर २०२२ अखेर दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करुन, पाटचाऱ्या व वितरिकांची कामे करण्याचे नियोजन आहे.”

दरम्यान माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी गत युती शासनाचे जलसंपदा मंत्री यांनी राहुरी तालुक्यातील तत्कालीन आमदार यांचे आग्रहात्सव २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक पूर्व शेतकरी मेळावा घेऊन या ठिकाणी निळवंडे कालव्याचे उदघाटन केले होते.मात्र जलसंपदा मंत्र्यांचा दौरा संपताच ती मशिनरी इंधना अभावी बंद पडली होती.व काही दिवसात ती तेथून परागंदा झाली होती याचे स्मरण करून देत जलसंपदा अधिकाऱ्यांचे कान टोचले व तसा प्रकार आता चालणार नाही अशा कानपिचक्या दिल्या असून,” हे काम नक्की कधी पूर्ण होईल ? या बाबत नगर येथील जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांचेकडून शब्द घेतला व आपले त्यावर लक्ष आहे असा थेट इशारा दिला आहे.त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.
“माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मागणीनुसार मुळा व भंडारदरा धरणाच्या सिंचन व्यवस्थापनाची नाशिक येथील मंडळ कार्यालये नगर येथे हलविण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. तो प्रश्न लवकरच मार्गी लागेल. मुळा नदीपात्रातील चार बंधाऱ्यांसाठी मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता व तांत्रिक अडचणी पाहून त्यावर कसा मार्ग काढता येईल ते पाहू. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.”असेही मंत्री पाटील यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close