जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे कालव्यांचे अस्तरीकरण करा-कालवा कृती समितीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांना तातडीने अस्तरीकरण करावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली असून त्यासाठी स्वतंत्र ०१ हजार ४०० कोटींची आर्थिक तरतूद करावी असे त्यांनी म्हटले आहे.

“अकोलेतील निळवंडे कालव्यांचा पाणी पाझर वाढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे उभी उन्हाळ पिके,घरे,रस्ते,दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याने नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी”-आ.डॉ.किरण लहामटे,अकोले आमदार.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत सप्ताहात अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दि.३१ मे २०२३ रोजी दुपारी १२.१० वाजता निळवंडे धरणाच्या कालव्यांचे विधिवत ‘जलपूजन’ केले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती व लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांनीं समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान दोन दिवसात सदर पाणी केवळ दहा कि.मी.अंतर पार करू शकले नाही.त्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे सदर मुख्य कालवा हा अकोले व संगमनेर तालुक्यातील डोंगराळ व उंच भागातून जात आहे.त्यामुळे या डोंगराळ भागातील जमिनीस मोठ्या प्रमाणावर सच्छिद्रता आहे.त्यामुळे पाणी जमिनीत मूरत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे,पशुधन,दुग्ध व्यवसाय,कुक्कुटपालन आदी व्यवसाय व उभी उन्हाळी पिके अडचणीत आले आहे.घर आणि गोठ्यात पाणी घुसले आहे.व उभ्या पिकांचे अंशतः नुकसान होत आहे.परिणामी पुढील भागात पाणी जाणे अवघड बनले आहे.आमच्या निळवंडे कालवा कृती समितीने या पूर्वीच सदर मुख्य कालवा हा अस्तरीकरण करावा अशी मागणी दि.०२ नोव्हेंबर २०२१ रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे केली होती.त्यांनी त्यासाठी ०५ हजार १७७ कोटी ३८ लाख रुपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता तयार केली होती.त्यास जलसंपदाचा अधिभार घेतल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी दिली आहे.मात्र त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यासाठी तातडीने ०१ हजार ४०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.अस्तरीकरण नसल्याने आता कालव्याचे पाणी पुढे सरकेनासे झाले आहे.त्यामुळे दुष्काळी १८२ गावात पाणी पोहचणे अवघड बनले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती पुन्हा एकदा सदर मागणी करत आहे.शिवाय सदर कामास नुसते अस्तरीकरण करून उपयोग नाही बऱ्याच ठिकाणी सदर कालवा हा डोंगराच्या कडेने जात आहे.त्या डोंगरास व खडकात मोठ्या प्रमाणावर सप (पाणी जमिनीत झिपरण्यासाठी असलेला सच्छिद्र व पोकळ भाग)आहे.परिणामी मोठ्या प्रमाणावर होणारी सिंचन गळती कमी होणार आहे.त्यामुळे निव्वळ अस्तरीकरण करणे पुरेसे ठरणार नाही त्यासाठी अकोले व संगमनेर तालुक्यात लोखंडी शिस्याचा वापर करून अस्तरीकरण करणे आवश्यक आहे.त्यासाठी वर्तमानात आपण आर्थिक तरतुद करणे गरजेचे असताना आगामी काळात मुख्य चाऱ्या व पाईप चाऱ्यासाठी आर्थिक तरतूद करून त्याच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागणार आहे त्यासाठी आपण तरतुद करून सदर काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे अशी मागणी करत आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे या धरण प्रकल्पावर विशेष लक्ष असून त्यासाठी ते कार्यवाही करतीलअसा शेतकऱ्यांना विश्वास वाटत असल्याचे कालवा कृती समितीस वाटत असल्याचे म्हटले आहे.
या मागणी संबंधी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,उत्तमराव जोंधळे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,अशोक गांडोळे,बाळासाहेब सोनवणे,नामदेव दिघे,पाटीलबा दिघे,रावसाहेब मासाळ,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,अड्.योगेश खालकर,गोरक्षनाथ शिंदे,दगडू रहाणे,तानाजी शिंदे,जालिंदर लांडे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close