जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

… या महाराजामुळे कोपरगावचे नाव राज्यभर-माजी  नगराध्यक्ष पाटील

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेले ह.भ.प.व भागवताचार्य बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्यामुळे कोपरगावचे नाव राज्यभर प्रसिद्ध झाले असून त्यांचे धार्मिक कार्य सर्व परिचित असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नूकतेच केले आहे.

भागवताचार्य व साई कथाकार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या वाणीतून या भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरात आयोजन करण्यात आलं आहे.जवळजवळ शंभर महिला व पुरुष कोपरगावातून ८ दिवसासाठी सहभागी झाले आहेत.

कोपरगाव शहरात बाळकृष्ण सुरासे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली आज राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस भरून भाविक कोपरगावहून पंढरपूरला ‘ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या’साठी रवाना झाले.या बसचे पूजन व श्रीफळ वाढवून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते गाड्यांनी प्रस्थान केले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

भागवताचार्य व साई कथाकार ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या वाणीतून या भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरात आयोजन करण्यात आलं आहे.जवळजवळ शंभर महिला व पुरुष कोपरगावातून ८ दिवसासाठी सहभागी झाले आहेत.

वर्षभर श्री बाळकृष्ण महाराज यांच्या वाणीतून नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाराजांचे प्रवचने सतत चालू असतात.या कार्यक्रमाचे नियोजन तांबट व त्यांचे सर्व भजनी मंडळ करतात.यावेळी सर्व खर्च भोजनाचा बन्सीभाऊ मोरे व इतर दानशूरांनी उचलला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कोपरगावातील भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते.सुरासे महाराजांसोबत ह.भ.प.भाऊसाहेब महाराज नाईक,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जाधव,अशोक महाराज नाईक,कैलास महाराज जाधव,हरिदास महाराज ढगारे, विलास महाराज नाईक,रामेश्वर महाराज जाधव,दत्ता महाराज जेजुरकर,बाळासाहेब महाराज कुळधरणआदी मंडळी समाविष्ट आहे.

दरम्यान दोन्ही बसच्या वाहक-चालक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.यावेळी बन्सी भाऊ मोरे,छायाचित्रकार हेमचंद्र भवर,संतोष सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close