शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील…या शालांत परीक्षेचा निकाल जाहीर

संवत्सर-(प्रतिनिधी)

जनता इंग्लिश स्कुलचा निकाल जाहीर झाला असून यात पगारे जयेश सुनील याने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर गायकवाड प्रणव योगेश याने ९३.२० टक्के गुण मिलवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तर तृतीय स्थानी सोनवणे उमाकांत संजय याने ९१.६० टक्के गुण प्राप्त करून राहिला आहे.विद्यार्थिनीमध्ये कर्पे ऋतुजा गोरक्ष हिने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी तसंच पालकांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागून होतं.हे दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांसाठी निर्णायक मानले जातात.विद्यर्थी तसंच पालकांची प्रतिक्षा आज संपुष्टात आली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९३.८३ लागला आहे.सालाबादाप्रमाणे याही वर्षी या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.यात ९२.०५ टक्के मुलं वत्तीर्ण झाले असून मुलींची टक्केवारी ही ९५.८७ टक्के एवढी आहे.या निकालात राज्यातील विभागांमध्ये कोकण विभागाने ९८.११ टक्क्यांसह पहिलं स्थान पटकावलं आहे.तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हा निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.