जलसंपदा विभाग
जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिला निळवंडे कालव्यांना सर्वोच्च निधी,शेतकऱ्यांत समाधान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांची कामे वेगाने सुरु आहेत २०२२ अखेर दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली जाईल असे दिलेले आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने निभावले असून गत दोन वर्षात त्यांनी ०१ हजार ०५६ कोटींचा निधी दिला आहे.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समिती पदाधिकारी व लाभक्षेत्रील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला प्रतिसाद देत राज्यातील आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कडून दोन वर्षात अनुक्रमे गत वर्षी ४९१ कोटी तर दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड कडून) २०० कोटी मंजूर केले होते. (हा निधी जसे काम होत जाते त्या प्रमाणे संबधित विभागास निधी पुरवला जात असतो.) या खेरीज राज्य सरकारच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी भेट घडवून दिल्या प्रमाणे कालवा कृती समितीस मंत्रालयात संपन्न झालेल्या दि.२९ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीत व राहुरीतील वेळोवेळी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे,”या कालव्याना निधी कमी पडू देणार नाही” हे आश्वासन आज अखेर पाळले असून त्यांनी दोन वर्षात जवळपास ०१ हजार ०५६ कोटींचा निधी दिला आहे.
गत ५२ वर्षांपासून प्रलंबित असलेला निळवंडे प्रकल्पाचा लढा निळवंडे कालवा कृती समितीने रस्त्यावर अड्.अजित काळे यांच्या मदतीने लढताना उच्च न्यायालयात नेला त्यामुळे निळवंडे कालव्यांत बसलेले राजकीय शुक्राचार्यांना बाहेर काढणे सोपे गेले व त्यांचे या प्रकल्पाबाबत मागे फिरण्याचे दोर कापले गेल्याने हा प्रकल्प कोरोना काळातही सुरु ठेवावा लागला.यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेली सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात माजी खा.प्रसाद तनपुरे व त्यांचे सुपुत्र ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा दुष्काळी भागातील १८२ गावातील शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात उजळली आहे.
निळवंडे कालव्याच्या मंजुरीस जवळपास ५१ वर्षाचा कालखंड उलटला आहे.मात्र अद्यापही कालव्याच्या कामांची साडेसाती संपलेली नाही.काही नेत्यांचे या प्रकल्पाचे पाणी पळविण्याचे काम सुरूच आहे.धरणाचे काम पूर्ण होऊन चौदा वर्षाचा कालखंड उलटत आला आहे.कालव्याचे काम त्या बरोबरीने होणे गरजेचे होते.मात्र त्याला उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय धुरिणांनी सविस्तर बगल दिली होती.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने हा लढा रस्त्यावर लढताना उच्च न्यायालयात नेला त्यामुळे निळवंडे कालव्यांत बसलेले राजकीय शुक्राचार्यांना बाहेर काढणे सोपे गेले व त्यांचे या प्रकल्पाबाबत मागे फिरण्याचे दोर कापले गेल्याने हा प्रकल्प कोरोना काळातही सुरु ठेवावा लागला.यात निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात माजी खा.प्रसाद तनपुरे व त्यांचे सुपुत्र ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.
त्यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला प्रतिसाद देत राज्यातील आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कडून दोन वर्षात अनुक्रमे गत वर्षी ४९१ कोटी तर दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड कडून) २०० कोटी मंजूर केले होते. (हा निधी जसे काम होत जाते त्या प्रमाणे संबधित विभागास निधी पुरवला जात असतो.) या खेरीज राज्य सरकारच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी भेट घडवून दिल्या प्रमाणे कालवा कृती समितीस मंत्रालयात संपन्न झालेल्या दि.२९ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीत व राहुरीतील वेळोवेळी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासना प्रमाणे,”या कालव्याना निधी कमी पडू देणार नाही” हे आश्वासन आज अखेर पाळले असून त्यांनी दोन वर्षात जवळपास ०१ हजार ०५६ कोटींचा निधी दिला आहे.
या बाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील,माजी खा.प्रसाद तनपुरे,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींचे निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे सर,गंगाधर रहाणे,नानासाहेब गाढवे,रमेश दिघे,दत्तात्रय आहेर,विठ्ठलराव देशमुख,संतोष देशमुख,बाबासाहेब गव्हाणे,आप्पासाहेब कोल्हे,कौसर सय्यद,तान्हाजी शिंदे सर,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,नामदेव दिघे,परबत दिघे,विठ्लराव पोकळे,संतोष तारगे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,नवनाथ थोरात,उपसरपंच विजय थोरात,प्रकाश थोरात.डी.के.थोरात.अशोक शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,सचिन मोमले,बाळासाहेब सोनवणे,अशोक गांडूळे,संतोष गाढे,आबासाहेब सोनवणे,अड्.योगेश खालकर,रंगनाथ गव्हाणे,माधव गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,महेश लहारे,सोमनाथ दरंदले,दौलत दिघे,रामनाथ ढमाले,विक्रम थोरात,रावसाहेब मासळ,कैलास गव्हाणे,ज्ञानदेव हारदे आदींसह लाभक्षेत्रातील १८२ गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.