शैक्षणिक
प्रा.ठाणगे यांना पी.एच.डी.प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.विजय ठाणगे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ,नांदेड़ या विद्यापीठाची इंग्रजी विषयात विद्या वाचस्पति (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रा.विजय ठाणगे यांनी डॉ.दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रेमचंद व अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर आपला शोध-प्रबंध सादर केला होता.त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजिव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.