जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

मोफत अनुदानित बियाणे वाटप सुरू,शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावीत यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले होते.त्या पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू आहे.योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ होती,मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती.आता सदर बियाणे मंजूर करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे.

    खरीप हंगाम २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू आहे.योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ होती,मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती.आता सदर बियाणे मंजूर करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे.
यापैकी अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना एकूण ५० लाख रुपयांचे प्रमाणित केलेले अनुदानित बियाणे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून या बियाणांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

   यामध्ये ३३५ क्विंटल फुले दूर्वा या वाणाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध असून हे बियाणे शेतकऱ्यांना मौनगिरी कृषी दिपक कृषी सेवा केंद्र कोपरगाव,कोपरगाव खरेदी विक्री संघ कोपरगाव,कृषीधन कृषी सेवा केंद्र कोपरगाव व मंजूर प्रगत विविध कार्यकारी सेवा सोसायटी मंजूर या ठिकाणी मोफत बियाणे उपलब्ध आहे.या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांनी आपली बियाणे कृषी विभागाच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून आपले नोंदविलेले बियाणे घ्यावीत.

   दरम्यान यात राज्य शासनाच्या वतीने कृषी गटासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये १७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक,४० हेक्टर क्षेत्रावर तुर व सोयाबीन तसेच २० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.यासाठी शेतकरी गटांनी देखील आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर दाखल करावे असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close