जलसंपदा विभाग
निळवंडेचे पाणी दुष्काळी भागात आणण्याचे श्रेय कालवा समितीचे-गुंजाळ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे डाव्या कालव्यांची नुकतीच जलसंपदा विभागाने चाचणी केली असून यातील डाव्या कालव्याव्दारे पाणी दुष्काळी भागात आनण्याचे श्रेय हे निळवंडे कालवा कृती समितीचे असल्याचे प्रतिपादन कृती समितीचे कार्यकर्ते व युवा नेते कानिफनाथ गुंजाळ यांनी काकडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“वर्तमानात सदर कालव्यांना पाणी सोडल्यावर सदर पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी अद्याप पाईप चाऱ्या जलसंपदा विभागाने निर्माण केलेल्या नाही.त्यामुळे सदर पाणी तात्पुरते लाभक्षेत्रातील नदी,नाले,पाझर तलाव,के.टी.वेअर,बंडीग आदीत संगमनेर तालुक्यापासून खाली सर्वत्र तातडीने सोडण्यासाठी नदी,नाल्याच्या ठिकाणी एस्केप व फाटके बसवणे गरजेचे आहे”-संजय गुंजाळ,उपाध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे डाव्या कालव्यांचे काम विक्रांत काले व पत्रकार नानासाहेब जवरे यांनीं निळवंडे कालवा कृती समितीच्या जनहित याचिकेद्वारे व अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयाच्या दि.१८ जानेवारी २०२३च्या आदेशाने डाव्या कालव्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी गत महिन्यात दि.३१ मे २०२३ रोजी दुपारी १२.१० वाजता निळवंडे धरणाच्या कालव्यांचे विधिवत ‘जलपूजन’ केले आहे.त्यासाठी कालवा कृती समिती व लाभक्षेत्रातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांनीं समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान निळवंडे डाव्या कालव्यांची नुकतीच जलसंपदा विभागाने चाचणी केली असून यातील काही पाणी जतन करून कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांचे सह समितीच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान मूर्तीस मोठ्या उत्साहात जलाभिषेक केला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,समितीचे कार्यकर्ते जेष्ठ कार्यकर्ते सोमनाथ दरंदले,कानिफनाथ गुंजाळ,काकडीच्या येथील पोलीस पाटील आबासाहेब गुंजाळ,मल्हारवाडी येथील पोलीस पाटील मधुकर गुंजाळ,देवराम दिघे,भाऊसाहेब गुंजाळ,आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”पाईप चाऱ्यांचा उपग्रहीय सर्वेक्षण संबंधिताकडून ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अभिप्रेत होणे गरजेचे होते.मात्र ते झालेले नाही हि बाब चिंताजनक आहे.त्यासाठी वर्तमानात आपण वरील दोन बाबीसाठी आर्थिक तरतुद करणे गरजेचे आहे.आगामी काळात मुख्य चाऱ्या व पाईप चाऱ्यासाठी आर्थिक तरतूद करून त्याच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागणार आहे.या शिवाय पावसाळा सुरु झाला आहे.मात्र काही ठिकाणी अद्याप पाऊस नाही.त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी पाण्याची चातकासारखी वाट पाहत आहे.मात्र वर्तमानात सदर कालव्यांना पाणी सोडल्यावर सदर पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी अद्याप पाईप चाऱ्या जलसंपदा विभागाने निर्माण केलेल्या नाही.त्यामुळे सदर पाणी तात्पुरते लाभक्षेत्रातील नदी,नाले,पाझर तलाव,के.टी.वेअर,बंडीग आदीत संगमनेर तालुक्यापासून खाली सर्वत्र तातडीने सोडण्यासाठी नदी,नाल्याच्या ठिकाणी एस्केप व फाटके बसवणे गरजेचे आहे.त्यासाठी राज्य सरकारने मोठी आर्थिक तरतुद करून सदर काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे अशी मागणीही कानिफनाथ गुंजाळ यांनी शेवटी केली आहे.
त्यावेळी हनुमान मंदिरात रांजणगाव देशमुख येथील गुरु श्री काथे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिपूर्वक जलाभिषेक करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी केले तर सूत्रसंचालन मधुकर गुंजाळ यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन नानासाहेब जवरे,सोमनाथ दरंदले आदींनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार भाऊसाहेब गुंजाळ यांनी मानले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.