जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

…या गांवात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सहस्त्रार्जुन याने आपव वसिष्ठ नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याने सहस्रर्जुनाला शाप दिला की,‘तुला व उन्मत्त क्षत्रियांना मारण्यासाठी विष्णू अवतार घेईल’ अशी कथा हरिवंशात आढळते.नर्मदेच्या तीरावर जमदग्नींचा आश्रम होता.तेथे वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला.ही तिथी परशुरामजयंती म्हणून समजली जाते.ती कोपरगावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार व एक वैदिक ऋषी.हनुमान आदी सात चिरंजीवांपैकी एक.भृगुकुलातील जमदग्नी ऋणी हा त्याचा पिता व इक्ष्वाकू वंशीय राजाची कन्या रेणुका ही त्याची माता.भृगुकुलोत्पन्न म्हणून भार्गवराम,असेही त्याचे नाव रूढ आहे.हा विष्णूचा अवतार व शिवाचा भक्त होता.परशुराम हा विष्णूचा अवतार असल्याच्या कथा विविध पुराणांत आढळत असल्या,तरी इतर अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण मात्र नाही.सहस्त्रार्जुन याने आपव वसिष्ठ नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याने सहस्रर्जुनाला शाप दिला की,‘तुला व उन्मत्त क्षत्रियांना मारण्यासाठी विष्णू अवतार घेईल’ अशी कथा हरिवंशात आढळते.नर्मदेच्या तीरावर जमदग्नींचा आश्रम होता.तेथे वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला.ही तिथी परशुरामजयंती म्हणून समजली जाते.ती भारतभर सर्वत्र साजरी केली जाते.ती नुकतीच कोपरगाव शहरातही ब्राम्हणसभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे.माजी आ.स्नेहलता कोल्हे,गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जेष्ठ सदस्य सुधाप्पा कुलकर्णी,वकील संघाचे माजी अध्यक्ष अॕड.जयंत जोशी,पत्रकार मनोज जोशी,प्रा.अविनाश घैसास आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती.तिंचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याजवळ करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी संगमनेर येथिल प्रा.सतिष देशपांडे यांनी लिहिलेले भगवान परशूराम यांचे जीवन चरीत्राचे पुस्तक ब्रम्हतेज व परशूराम स्तवन आणि नंदुरबार येथिल उदय जोशी यांनी प्रायोजित केलेल्या भगवान परशूराम प्रतिमेचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी गावातील रेणुका माता देवीच्या मंदीरात आ.काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची आरती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मकरंद को-हाळकर,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे,संजय देशपांडे यांनी केले तर ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले आहे.सदर प्रसंगी कोपरगांव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर व त्यांच्या पत्नी सुनिता को-हाळकर यांचे हस्ते भगवान परशूरामाचे पुजन विधीवत करण्यात आले.या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न वैभव जोशी व त्यांच्या सहकारी यांनी केले.त्यानंतर सभेच्या विविध उपक्रम व मंगल कार्यालयाची माहीती प्रसाद नाईक यांनी करुन दिली आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण समाज महीला मंडळाच्या कार्याध्यक्ष अॕड.श्रध्दा जवाद,वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर,योगेश कुलकर्णी,सदाशिव धारणगांवकर,आदीनीं प्रयत्न केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close