जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहर विकासाठी निधी कमी पडू देणार नाही-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समाजाच्या समाज मंदिरांसाठी निधी दिला असून समाज मंदिराची कामे सुरु झाली आहेत.या समाज मंदिरात सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे त्यादृष्टीने आदर्शवत समाजमंदिर उभे राहण्यासाठी अधिकच्या निधीची गरज पडल्यास जास्तीचा निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी दिली.कोपरगाव शहरातील विविध समाजमंदिरांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

कोपरगाव शहरातील विविध समाजाच्या समाज मंदिरासाठी निधी मिळावा अशी अनेक समाजबांधवांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी सर्व समाजाला न्याय देवून प्रत्येक समाजाच्या मंदिर व समाज मंदिरासाठी निधी दिला आहे.या निधीतून मतदार संघासह कोपरगाव शहरातील अनेक समाज मंदिराचा समावेश आहे.यापैकी प्रभाग क्र.१३ मधील गजानन नगर मध्ये १५ लक्ष ७० हजार रुपये निधीतून परीट समाजाच्या सभा मंडपाचे व गोरोबानगर येथे १० लक्ष रुपये निधीतून कुंभार समाजाच्या सभामंडपाचे भूमिपूजन नुकतेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आ.काळे यांच्या हस्ते पार पडले आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,माजी नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे,रमेश गवळी,दिनकर खरे,मायादेवी खरे,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,बाळासाहेब रुईकर,वाल्मिक लहिरे,कोळगाव थडीच्या सरपंच मिनल गवळी,एकनाथ गंगूले,आकाश डागा,राजेंद्र आभाळे,शैलेश कदम,नितीन साबळे,मनोज नरोडे,संदीप सावतडकर,मुकुंद इंगळे,प्रमिलाताई जाधव,संध्याताई जगताप,मनिषाताई गवळी,सोनाली राऊत आदी मान्यवरांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close