जयंती,पुण्यतिथी अभिवादन
संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
महान हिंदू संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स.१४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी मानले जातात.त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते.त्यांनी लक्षणीय योगदान केले.त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.त्यांची जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीला सुरुवात झाली रविदास महाराजांच्या नामाचा जयघोष करत पालखीचे समाज मंदिरात आगमन झाले तदनंतर साई कथाकार ह.भ.प.विकास महाराज गायकवाड यांचे रविदास महाराज यांचे जीवनावरील प्रवचन संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे,श्रीरामपूरचे माजी आ.भाऊसाहेब कांबळे,संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष दवंगे,शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णु पाडेकर,रोहीत वाकचौरे,रमेश गवळी,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,भा.ज.पा.माजी गटनेते रविंद्र पाठक,जालिंदर लगड,विशाल झावरे,रोहीत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गांगुले,राजेंद्र वाकचौरे,माजी गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,डॉ.अनिरुद्ध काळे,वाल्मिक लहिरे,राज्यकार्यकारीनी सदस्य एम.डी.कानडे,माजी तहसीलदार डी.आर. दुशिंग,देविदास कानडे,जिल्हा सचिव संजय पोटे,युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग,शहर अध्यक्ष गणेश कानडे,संजय कानडे,मगर सर,संकेत कानडे आदी समाज बांधव व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे,महिला राज्य कार्य सदस्या स्नेहाताई कानडे,वसंतराव थोरात,संजय सरवार,संतोष शिंदे,भैया कानडे,तालुका कार्याध्यक्ष अँड.रमेश दुशिंग यांनी पाहुण्यांचा यावेळी सत्कार केला आहे.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी माधव पोटे सर,युवा जिल्हा संघटक पदी संजय सरवार,शहर उपाध्यक्ष पदी संतोष दळवी यांची नियुक्ती बद्दल व मेहता कन्या विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
माजी आ.कोल्हे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष तथा माजी आ.कांबळे यांच्या सह सर्व उपस्थित पाहुण्यांना शाल,श्रीफळ,हार देऊन चर्मकार समाज्याच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत थोरात यांनी केले तर सूत्रसंचलन संजय दुशिंग यांनी तर उपस्थितांचे आभार नूतन जिल्हा संघटक संजय सरवार यांनी मानले आहे.