जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात…या महाविद्यालयात ‘गणित दिन’ उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जन्मदिवस २२ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.कोपरगावातील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
राष्ट्रीय गणित दिवस २०२१ महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो.प्राचीन काळापासून,आर्यभट्ट,ब्रह्मगुप्त,महावीर,भास्कर दुसरा,श्रीनिवास रामानुजन इत्यादींसारख्या गणितात विविध विद्वानांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे हे आपल्याला माहीत आहे.त्यातील एक नाव म्हणजे रामानुजन.
अगदी लहान वयात,श्रीनिवास रामानुजन यांनी एक विशिष्ट प्रतिभा दाखवली.अनंत मालिका,संख्या सिद्धांत,गणितीय विश्लेषण इत्यादी अनेक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत.या दिवसाची सुरुवात माजी पंतप्राधान मनमोहन सिंग यांनी सन-२०१२ पासून सुरु केली आहे.त्या निमित्ताने सोमैय्या महाविद्यालयातील गणित विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नारायणगाव महाविद्यालयाचे प्रा.डॉ.लहू गायकवाड हे उपस्थित होते.
डॉ.लहू गायकवाड यांनी ‘गणिताचा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्रीनिवास रामानुजन यांच्या संपूर्ण कार्याची ओळख करून देतानांच त्यांनी गणित विषयात केलेल्या योगदानाचा सखोल वृतांत विद्यार्थांसमोर नमूद केला आहे.गणिताचा मनुष्य व एकूणच समाजाशी असलेल्या इतिहासाचा आलेख प्रस्तुत करतांनाच श्री रामानुजन यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे असेही त्यांनी सांगितले आहे.या वेळी गणित विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या कार्याची माहिती मिळावी या उद्देशाने पोष्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोष्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले तसेच या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थांना प्रमुख पाहुण्यांचा शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव अॅड्. संजिव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे हे उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आपल्या शुभसंदेशात विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना श्रीनिवास रामानुजन यांचे गणितीय क्षेत्रातील कार्य केवळ विज्ञान शाखेतीलच नाही तर विविध विद्याशाखेतील विद्यार्थांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले आहे.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.विजय ठाणगे,विज्ञान शाखाप्रमुख डॉ.बी.बी.भोसले,इतिहास विभागप्रमुख प्रो.के.एल.गिरमकर यांची मनोगते संपन्न झाली.यावेळी प्रा. शिवाजी शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय गणित विभागप्रमुख डॉ.बी.डी.गव्हाणे यांनी करून दिला.तर सूत्रसंचलन.कु.पल्लवी घुगे व आभार कु.श्रुतिका गव्हाळे या विद्यार्थिनींनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.उकिर्डे,प्रा.डुबे,प्रा.पारधी,प्रा.बोंडखळ,प्रा.पवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे..