कोपरगाव शहर वृत्त
नवीन पिढीने वाचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही-…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पूर्वीच्या काळी सामाजिक व धार्मिक पारतंत्र्यामुळे आणि आजच्या काळात आधुनिकतावादाच्या रेटयामुळे आपले वाचन अजूनही मर्यादितच आहे.माहिती-तंत्रज्ञान झपाट्याने आपल्याला कवेत घेतयं हे खरं आहे पण म्हणून नवीन पिढीने वाचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे प्रतिपादन कोपरगाव येथील क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी नुकतेच एका कार्यक्रमत बोलताना केले आहे.
“सदरचा गुणवंत विध्यार्थी गुणगौरव सोहळा ही कोपरगाव नगरपरिषदेची परंपरा आहे.अशा कार्यक्रमांमुळे विध्यार्थ्याच्या मनात जिद्द तयार होते,त्यांची स्पर्धक वृत्ती वाढीस लागते आणि यातूनच भविष्यात चांगले अधिकारी प्रशासक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी तयार होऊ शकतात”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्यानिमित्त कोपरगाव नगरपरिषदेने शालेय अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार अर्पण केले आहे.त्यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,रोटरी क्लब कोपरगावचे अध्यक्ष विरेन अग्रवाल,माजी नगरसेवक अतुल काले,वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी,पालक,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी मुख्याधिकारी गोसावी यांनी,”सदरचा गुणवंत विध्यार्थी गुणगौरव सोहळा ही कोपरगाव नगरपरिषदेची परंपरा आहे.अशा कार्यक्रमांमुळे विध्यार्थ्याच्या मनात जिद्द तयार होते,त्यांची स्पर्धक वृत्ती वाढीस लागते आणि यातूनच भविष्यात चांगले अधिकारी प्रशासक आणि कर्तव्य दक्ष अधिकारी तयार होऊ शकतात.सदरचा गुणगौरव हा केवळ विध्यार्थ्यांचा नसून त्यांच्या पालकांचा आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचाही आहे असेही शेवटी सांगितले आहे.सदर प्रसंगी विरेन अग्रवाल,अतुल काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी एम.के.आढाव शाळेच्या चार विध्यार्थीनी सिंधखेडराजा या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ‘जंप रोप’ स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविल्यामुळे आणि त्यापैकी दोन विध्यार्थीनींची महाराष्ट्र संघात निवड झाले बद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्मचारी श्री.शेलार,महेश थोरात आणि सौ.राक्षे यांनी प्रयत्न केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक रवींद्र वाल्हेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.गवांदे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार रामनाथ जाधव यांनी मानले आहे.