कोपरगाव शहर वृत्त
निवडणूक पाहून समस्या आठवल्या असल्याचा…यांचा आरोप

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
तुम्ही पाच वर्ष सत्ता असतांना काडीचे काम केले नाही आता डोळ्यासमोर निवडणूक दिसू लागल्यावर आता जनतेच्या समस्या दिसू लागल्या असून सत्य ते काय आहे हे जनतेला माहीत असून आपण राजकीयदृष्ट्या पिछाडीवर गेल्याने जनतेचे प्रश्न आठवण्यास लागले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी कोल्हे गटाच्या माजी नगरसेविका ताराबाई जपे यांना उद्देशून केला आहे.

“तुम्हाला सत्ताधारी नगरसेवक होण्याची संधी मिळाली असतांना तुम्हाला प्रभाग क्रमांक एकच्या समस्या सोडविता आल्या नाही.त्या काळात जर तुम्हाला समस्या सोडविता आल्या असत्या तर आज तुम्हाला अपयश झाकण्यासाठी नगरपरिषदेला दोष देवून उपोषण करण्याचा ईशारा देण्याची वेळ तुमच्यावर आली नसती हे प्रभागातील जनतेला माहित आहे”- शैलेश साबळे,कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस.अजित पवार.
कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या खडकी या उपनगरात नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असून त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत अनेक जण आजारी पडत असून विजेचा मोठ्या प्रमाणावर खेलखंडोबा होत असल्याची तक्रार कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका ताराबाई गणपत जपे आणि अन्य नागरिकांनी केल्या होत्या त्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक एक मधील विकासकामे मार्गी लागावी यासाठी प्रभागातील मतदारांनी तुम्हाला मोठ्या विश्वासाने निवडून देवून कोपरगाव नगरपरिषदेत पाठविले.मात्र पाच वर्ष सत्ता असतांना देखील काहीच विकास कामे केली नाही हे प्रभागातील जनतेला माहित आहे.आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार संपूर्ण कोपरगाव शहरासह प्रभाग क्रमांक एक मधील सुखशांती नगर,समता नगर या ठिकाणी विविध विकासकामे सुरु असतांना तुम्ही विकासकामे व्हावेत यासाठी कोपरगाव नगरपालिकेला उपोषणाचा ईशारा देवून जनतेला वेड्यात काढण्याचा करीत असलेला प्रयत्न केविलवाणा असला तरी जनता तुमच्या ढोंगाला फसणार नाही.
तुम्हाला सत्ताधारी नगरसेवक होण्याची संधी मिळाली असतांना तुम्हाला प्रभाग क्रमांक एकच्या समस्या सोडविता आल्या नाही.त्या काळात जर तुम्हाला समस्या सोडविता आल्या असत्या तर आज तुम्हाला अपयश झाकण्यासाठी नगरपरिषदेला दोष देवून उपोषण करण्याचा ईशारा देण्याची वेळ तुमच्यावर आली नसती हे प्रभागातील जनतेला माहित आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडून आज जवळपास आठ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या आठ वर्षात आजच आपल्याला प्रभाग क्रमांक एकच्या समस्या दिसायला लागल्या हे प्रभागातील जनतेचे भाग्यच म्हणावे लागेल. तुम्ही आपणच कसे नागरिकांचे पालनहार आहोत हे दाखवून देत नागरिकांना जसे काही समजतच नाही हा तुमचा गोड गैरसमज मनातून काढून टाका,कारण तुम्ही जेवढे समजता तेवढी जनता दुधखुळी मुळीच राहिलेली नाही.त्यामुळे प्रभाग एकच्या समस्या मांडणे म्हणजे नक्राश्रू असल्याची टीकाही शैलेश साबळे यांनी शेवटी केले आहे.