कोपरगाव शहर वृत्त
हद्दवाढ झालेल्या उपनगरांचाही होणार विकासासाठी १० कोटी-कोपरगावात माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधी मिळावा याबाबत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या उपनगरांच्या विकासासाठी स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
“महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या लगत हद्दवाढ झालेल्या भागात वसलेल्या नाईकनगर,सह्याद्री कॉलनी,द्वारकानगरी,सोसायटी,गोकुळ नगरी,शंकर नगर मागील पवार वस्ती,ओम नगर,गवारे नगर,गवारे वस्ती,अयोध्या नगरी,धोंडीबानगर,हनुमाननगर,पवार वस्ती आदि उपनगरांसाठी तसेच हद्दवाढ झालेल्या इतर भागाच्या विकासासाठी स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोपरगाव शहराच्या लगत अनेक छोटी-मोठी उपनगरे वसलेली आहेत. या उपनगरातील नागरिकांना शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या रस्ते,पाणी,वीज,आरोग्य,भूमिगत गटारी आदी सुविधा मिळणे गरजेचे होते.त्यामुळे ज्याप्रमाणे मागील साडे तीन वर्षात कोपरगाव शहराचा विकास झाला त्याप्रमाणेच या उपनगरांचा देखील सर्वांगीण विकास होवून नागरिकांना सर्व मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी नागरिकांची मागणी होती.त्याबाबत या उपनगरांच्या विकासासाठी निधी मिळावा याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
महायुती शासनाने कोपरगाव शहराच्या लगत हद्दवाढ झालेल्या भागात वसलेल्या नाईकनगर,सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी,सोसायटी,गोकुळ नगरी,शंकर नगर मागील पवार वस्ती,ओम नगर,गवारे नगर,गवारे वस्ती,अयोध्या नगरी,धोंडीबानगर,हनुमाननगर,पवार वस्ती आदि उपनगरांसाठी तसेच हद्दवाढ झालेल्या इतर भागाच्या विकासासाठी स्वतंत्र १० कोटी निधी मंजूर केला आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील रस्ते,पाणी, वीज,आरोग्य,शहर सुशोभिकरण,भूमिगत गटारी आदी महत्वाचे प्रश्न सुटले आहेत.त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या उपनगरांच्या विकासाचा देखील प्रश्न मार्गी लागला आहे.उपनगरांच्या विकासासाठी अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.काळे यांनी सांगितले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र् फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.ज्याप्रमाणे कोपरगाव शहराचा विकास करून शहरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या त्याप्रमाणे हद्दवाढ झालेल्या भागाच्या उपनगरातील नागरिकांना आजवर झालेल्या त्रासाची दखल घेवून विकास कामांसाठी १० कोटी निधी मिळविल्याबद्दल आ.काळे यांचे हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांनी आभार मानले आहे.