कृषी व दुग्ध व्यवसाय
गोदावरी खोरे दूध संघास…या देशातील अभ्यासकांची भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतातील दुग्ध व्यवसाय आणि या व्यवसायातील महिलांचा सहभाग या विषयांवर अभ्यास करण्यासाठी फ्रान्स देशातील अभ्यासक विद्यार्थीनींनी नुकतीच गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.विविध विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करताना संघातील कामकाजाचे त्यांनी कौतुक केले आहे.
या अभ्यास दौऱ्यामध्ये दुग्ध व्यवसायाबरोबरच दुभत्या जनावरांचे संगोपन,त्यांची निगा,आरोग्य,पोषण,आहार,जनावरांची दूध देण्याची क्षमता यासंबंधी माहिती संकलीत करण्याबरोबरच दुग्ध व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग त्यातून महिलांना मिळणारा लाभ,महिलांची या व्यवसायातली कार्यपध्दती अशा अनेक विषयांवर या विद्यार्थीनींनी माहिती घेतली आहे.
संघास भेट देणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये अॅना गॅन्टर्ड,लॉरेन डेसोट्टर,ज्युलिएट फेरीयल यांचा समावेश होता.त्यांच्यासमवेत बायफ संस्थेचे पुणे येथील वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ.अक्षय जोशी, कोपरगांव बायफ कार्यालयाचे अधिकारी डॉ.बाळासाहेब जिगळेकर हेही उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
या अभ्यास दौऱ्यामध्ये दुग्ध व्यवसायाबरोबरच दुभत्या जनावरांचे संगोपन,त्यांची निगा,आरोग्य,पोषण,आहार,जनावरांची दूध देण्याची क्षमता यासंबंधी माहिती संकलीत करण्याबरोबरच दुग्ध व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग त्यातून महिलांना मिळणारा लाभ,महिलांची या व्यवसायातली कार्यपध्दती अशा अनेक विषयांवर या विद्यार्थीनींनी माहिती घेतली.अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी संघाच्या कार्यक्षमत्रामध्ये राबविल्या जात असलेल्या सॉर्टडसिमेन कार्यक्रमाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.अभ्यासकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन संघातील विविध युनिटची माहितीही श्री परजणे यांनी दिली.कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनीही चर्चेत सहभागी होऊन कामकाजाची माहिती दिली.त्यानंतर कार्यस्थळावरील सर्व विभागांना भेटी देऊन अभ्यासक विद्यार्थीनींनी समाधान व्यक्त केले.कोपरगांवसारख्या ग्रामीण भागात गोदावरी दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञनाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचेही मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.