आरोग्य
कोपरगावातील ‘त्या’ डॉक्टरांना पेंच अभयारण्याची सैरं ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोरोना कालखंडात राज्यातील अनेक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी आर्थिक लूट केली असल्याची चर्चा होती.त्यात संदर्भांकीत करणाऱ्या डॉक्टरांच्या ‘कट प्रॅक्टिस’चा भार रुग्णावर पडत असल्याच्या चर्चा होत्या.आता याच ‘कट प्रॅक्टिस’ करून रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या संभाजी चौकानजीक असलेल्या मोठया रुग्णालयास मदत करणाऱ्या व स्वतःचेही त्यात चांगभले करणाऱ्या ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना नुकतीच कोपरगाव शहरातील कोरोनात अग्रणी भूमिका निभावणाऱ्या एका खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरने अशा तब्बल ५२ दलाल डॉक्टरांना,”पेंच अभयारण्या”ची सैर घडविली असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.
पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे.२५७.२६ वर्ग कि.मी.क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो.नागपूरपासून ८६ कि.मी.अंतरावरील हे उद्यान खूप सुंदर आहे.आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”देशात कोरोना साथ जानेवारी २०२० मध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती.आधी या साथीच्या उपचाराबद्दल मोठ्या प्रमाणावर अज्ञान असल्याने या रुग्णांना उपचार मिळणे कठीण बनले होते.सरकारी रुग्णालये वगळता कोणीही यावर उपचार करण्यास धजावत नव्हते हे वस्तुस्थिती होती.त्याला राज्यासह कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नव्हता.यात रुग्ण दगावला तर परस्पर सरकारी रुग्णालय कर्मचारी,वा नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी परस्पर विल्हेवाट लावून टाकत असत.इतके या साथीबद्दल गैरसमज होते.मात्र पहिली साथ निमाली असता याबाबत काही बाबी उघड झाल्या व मुखपट्टी व हाथ धुवून नाका-तोंडाला हात न लागल्यास उचर करणे सोपे आहे असे लक्षात आले होते.त्या वेळी मात्र काही खाजगी रुग्णालये व तेथील डॉक्टरांनी धाडस करून उपचार सुरु केले.मात्र यातील भीती बऱ्या पैकी कमी झाल्यावर मात्र या उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचारार्थ भरती होणाऱ्या रुग्णांना आपली आर्थिक “हात की सफाई” दाखविण्यास सुरुवात केली होती.त्याचा अनेकांना लाखोंची बिले येऊन आर्थिक चटका सहन करावा लागला होता.त्यातच ग्रामीण भागातून जे डॉक्टर शहरातील एखादया तज्ञ डॉक्टरांकडे पाठवत तेथील डॉक्टर त्यांना आपल्या कमाईतील काही वाटा-हिस्सा संदर्भांकीत रुग्ण पाठविणाऱ्या डॉक्टरला देत त्यालाच ‘कट प्रॅक्टिस’ म्हणत असत.त्यातून हे शहरातील उपचार करणारे डॉक्टर भरती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत असत.मागून अनेक जण या ‘कट प्रॅक्टिसचा’ आधार घेऊ लागले होते.नाहीं म्हणायला ‘ती’ पूर्वी पासूनच सुरु होती.हे काही नवे प्रकरण नव्हते मात्र कोरोना उपचारात हि प्रथम वापरली जाणारी क्लुप्ती होती इतकेच.थोडक्यात ‘कट प्रॅक्टीस’ म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसऱ्या डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे.गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे.या ‘कट प्रॅक्टीस’मुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात होता.तीच स्थिती या प्रकरणात सुरु झाली होती.
‘कट प्रॅक्टीस’ म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसऱ्या डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे.गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे.या ‘कट प्रॅक्टीस’मुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.तीच स्थिती कोपरगावातील या प्रकरणात सुरु झाली असून लाभार्थी डॉक्टर आता कोरोना साथ संपल्यावर त्याचा आर्थिक फायदा उपटताना दिसत आहेत.त्यातूनच हि तीन दिवसीय पेंच अभयारण्य सैर घडली असल्याचे बोलले जात आहे.मात्र सर्वच डॉक्टर अशा पद्धतीचे नाही हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल काही सेवाभावी व नामांकित डॉक्टरही शहर व तालुक्यात आहेत.
काही वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर होते.कोणत्याही आजाराचे निदान,उपचार हे त्याच डॉक्टरकडे केले जात.आजार बरा होत नाही असे लक्षात आले तर फॅमिली डॉक्टर स्पेशालिस्टचा संदर्भ देत.‘रेफर’ करण्यामागील भावना चांगली होती.कुटुंबातील सगळ्या सदस्यांची मेडिकल ‘हिस्ट्री’ही त्या फॅमिली फिजिशिअनला माहित असायची.त्यामुळे संदर्भ दिलेल्या डॉक्टरांशी थेट बोलून उपचाराची दिशा काय आहे,याची विचारणाही फॅमिली डॉक्टर करू शकत.आता मात्र वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धा जीवघेणी झाली आहे.मल्टिस्पेशालिटीपासून सगळ्यांना एकाच छताखाली घेणाऱ्या स्टार कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे टारगेट डॉक्टरांपुढे आहेत.त्यामुळे नर्सिंग होम्स चालवण्याचे आव्हान वैयक्तिक प्रॅक्टिस करत असलेल्या डॉक्टरांना पेलवत नसल्याचे दिसते.अनेक डॉक्टरांनी स्वतःचे नर्सिंग होम्स बंद करून मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आहे.महिनाभरात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया,रुग्णसंख्या यांचा टक्केवारीतला चेक त्यांना महिन्याअखेरीस द्यावा लागतो.अन्यथा त्या रुग्णालयासोबत ‘अटॅचमेंट’ राहील की नाही,याची धाकधूक या रुग्णालये चालविणाऱ्या डॉक्टरांना असते.
हे टारगेट पूर्ण करण्यासाठी अनेकदा नको असलेल्या वैद्यकीय तपासण्या,शस्त्रक्रिया यांचाही भार रुग्णांवर टाकला जातो.साध्या आजारांसाठी ‘आय.सी.यू.’मध्ये दाखल केल्याच्या तक्रारी रुग्णाचे नातलग करतात तेव्हा स्वतःच्या ‘रिस्क’वर रुग्णाला घरी घेऊन जाणार का ? असा प्रश्न विचारला जातो.रुग्णांच्या कुटुंबीयांची लाखोंचे बिल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ येते.कोणत्या चाचण्या कशासाठी करायच्या,शस्त्रक्रिया केली नाही,तर त्याचे फायदे तोटे कोणते,याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला दिली जाते,तसेच या रुग्णसेवेचा खर्चाचे अंदाजपत्रकही हवे असते.ते मागण्याची हिंमत त्यावेळी त्यांच्यात नसते.नेमका याचाच फायदा हि मंडळी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.कोपरगाव शहरातही नेमके हेच झाले यातून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची यथेच्छ लूट झाली होती.मात्र सर्वच डॉक्टर अशा हडेलहप्पी पद्धतीचे नाही हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल काही सेवाभावी व नामांकित डॉक्टरही शहर व तालुक्यात आहेत हे वेगळे सांगणे न लगे !
आता त्याची पेंच या नागपूर नजीक सुंदर अभयारण्यात पाठवून सुमारे वीस हजारांची तीन दिवसांची प्रवासाची रेल्वे प्रवासाची बक्षिसी देण्यात आली असल्याची जोरदार उलटसुलट चर्चा शहर व तालुक्यात सुरु झाली आहे.कोरोना उपचार करून नातेवाईकांना आणि रुग्णांना लुटणारे ते लाभार्थी डॉक्टर कोण ? याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे.
कशासाठी प्रसिद्ध आहे पेंच अभयारण्य ?
पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे.२५७.२६ वर्ग कि.मी.क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो.नागपूरपासून ८६ कि.मी.अंतरावरील हे उद्यान खूप सुंदर आहे.आज या उद्यानाची योग्य ती निगा राखल्यामुळे नागपूर परिसरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र हे २२ नोव्हेंबर,१९७५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले असून केंद्र शासनाने १८ फेब्रुवारी,१९९९ रोजी भारतातील २५ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला.ताडोबानंतर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या दृष्टीने सर्वात चांगले जंगल ठरले आहे.पेंचला नुकताच पुरस्कारही मिळाला आहे.