कृषी व दुग्ध व्यवसाय
भारतीय गोवंशाच्या अनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती-…या महाराजांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शुद्ध देशी गाईंची निर्मिती करण्याकरिता विदेशात वापरले जाणारे भ्रूण प्रत्यारोपणाचे तंत्रज्ञान आपल्याकडेही आता वापरात येत असल्याने भारतीय गोवंशाच्या अनुवंशिक सुधारणेत मोठी क्रांती होणार असल्याचे प्रतिपादन वरदविनायक देवस्थानचे प्रमुख ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक यांनी सोनेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे.
“गोदावरी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष स्व.ज्ञानदेव गुडघे यांनी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देण्यासाठी दुग्धव्यवसायाचे महत्त्व पटवून देत वीरभद्र सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना करून अनेकांना गाई खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.त्यामुळेच या परिसरात दुग्ध व्यवसाय भरभराटीला आणला होता”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे,तालुका सहकारी दूध संघ.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व गोदावरी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव कारभारी गुडघे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघ व भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन प्रकल्पांतर्गत उरळीकांचन येथील बायफ संस्थेच्या सहकार्याने सोनेवाडी येथे भ्रूण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याप्रसंगी उद्धव महाराज बोलत होते.
यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील,संचालक राजेंद्र जाधव,कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे,ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब फटांगरे,जयराम पाचोरे,तुकाराम गुडगे, शिवाजीराव जावळे,विश्वनाथ जावळे, दिलीप गुडघे,भाऊसाहेब गुडघे,साहेबराव घोंगडे,वाल्मीक खरात, आप्पासाहेब गुंडे,धर्मा जावळे,संतोष गुडघे,संदीप गुडघे,डॉ.विनोद वाणी,पुष्पराज होळकर,सरपंच गंगाराम खोमणे , उपसरपंच किशोर जावळे , पोलीस पाटील दगू गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे,सोनेवाडी सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ मिंड,उपाध्यक्ष विजय फटांगरे,संजय गुडघे,उत्तम गुडघे,विजय गुडघे,तुळशीराम जावळे आदी उपस्थित होते
भारतात अनेक प्रकारच्या देशी गाई आढळून येतात मात्र त्यांचे दूध देण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांची संख्याही कमी होत आहे.देशी गाईंच्या संवर्धनासाठी गोदावरी खोरे दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने देशी गाईंचे संगोपन करण्यासाठी संकरीत गाईमध्ये देशी गायीचे भ्रूण प्रत्यारोपण करून देशी गाईंची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. यामुळे जन्माला आलेली कालवड संकरीत गायीप्रमाणे दूध दणार आहे.यामुळेे प्रत्यक्षात दूध उत्पादकांना फायदा होऊन भारतीय संस्कृतीचेही संवर्धन होणार आहे.भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी देशी गाय वाचली पाहिजे असल्याचेही ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी दूध उत्पादक दिलीप गुडघे यांच्या गोठ्यातील संकरीत गाईमध्ये भ्रुणप्रत्यारोपण करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पोलीस पाटील दगू गुडघे यांनी केले तर उपस्थितांचे डॉ.बाळासाहेब कोल्हे यांनी आभार मानले आहेत.