जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तीन तरुणी गायब,कोपरगाव तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रामवाडी संवत्सर येथील रहिवासी असलेली सत्तावीस वर्षीय मुलगी दि.२१ मार्च रोजी दुपारी १२ ते ०१ वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या शिवाय इंदिरा पथ रस्त्यालगत रहिवासी असलेली एक वर्षीय मुलगी नुकतीच गायब झाली असून देर्डे-चांदवड येथील एक सतरा वर्षीय मुलगी अशा तीन मुली नुकत्याच रहस्यमय रित्या गायब झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

इंदिरा पथ नजीक रहिवासी असलेली आपली महाविद्यालयीन मुलगी (वय-२३) कोणालाही काही न सांगता दि.१५ मार्च दरम्यान गायब झाली आहे.तिला अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे.सदर मुलीचा पिता नाही सर्व जबाबदारी आईवर असल्याने ती सैरभैर झाली आहे.मात्र तिला पोलीस मदत करत नसल्याची चर्चा आजूबाजूच्या नागरिकांकडून ऐकू आली आहे.त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,देर्डे-चांदवड ग्रामपंचायत हद्दीत व कोपरगाव शहरात घडली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की पहिल्या संवत्सर येथील तक्रारीत गायब मुलीच्या पिता (वय-६०) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,”आपण संवत्सर रामवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून शेती व नोकरीचा व्यवसाय करतो.आपली सत्तावीस वर्षीय मुलगी दि.२१ मार्च रोजी दुपारी १२-०१ वाजेच्या दरम्यान घरी कुणालाही काही एक न सांगता निघून गेली आहे.तिची उंची ५.५ फूट असून रंग गोरा आहे.ती सडपातळ असून अंगात ब्राऊन रंगाचा पंजाबी ड्रेस आहे.तर काळे लांब केस असून पायात तोरड्या आहेत.कानात टॉप्स आहे.पायात सॅंडल असून तिला मराठी,हिंदी,इंगजी आदी तीन भाषा बोलता येतात.तिचा आपण नातेवाईकांच्या कडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.

तर दुसऱ्या घटनेत देर्डे चांदवड येथील सतरा वर्षीय मुलगी गायब झाल्याची तक्रार मुलीचा चुलता याने दाखल केली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपण वरील गावचे रहिवासी असून आपला भाऊ हा सोनारी येथे रहिवासी आहे.तो पत्नी,तीन मुली,वडील असे मिळून राहतात.त्यांच्याकडील मुलगी हि पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडे असलेल्या आईस भेटण्यासाठी आली होती.तिचे शिक्षण हे रवंदे येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी पर्यंत झाले आहे.आपण वीट भट्टीवर मंजुरीने कामास जातो.दि.२१ मार्च रोजी दिवसभर कामास जाऊन आल्यावर जेवणासाठी बसलो असता आपली पुतणी घरात दिसली नाही.म्हणून आई व पत्नीस विचारपूस केली असता.’ती’ गायब आढळली.आजूबाजूस शोध घेऊन पाहिले असता ‘ती’ मिळून आली नाही.त्या बाबत आपण आपल्या भावास माहिती देऊन सांगितले होते.त्याने व आपण शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे आमची खात्री झाली आहे की तिला कोणी तरी ‘अज्ञात’ इसमाने ‘अज्ञात’ कारणासाठी पळवून नेले आहे.तिची उंची चार फूट ०५ इंच असून केस लांब आहेत.चेहरा उभट असून नाक बसके आहे.डाव्या गालावर जुन्या शस्त्रक्रियेची खून आहे.अंगात लाल रंगाचा घागरा,लाल रंगाची लेगीज पायात पैंजण व पांढऱ्या रंगाचे सॅंडल असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तर तिसऱ्या घटनेत कोपरगाव शहरातील इंदिरापथ कर्मवीरनगर नजीक रहिवासी असलेल्या मुलीच्या नातेवाईकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,आपण कर्मवीर नजीक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो.आपल्यासोबत आपली महाविद्यालयीन मुलगी व मुलगा असे इंदिरापथ नजीक रहातो.आपली महाविद्यालयीन मुलगी (वय-१६ वर्ष ४ महिने) कोणालाही काही न सांगता दि.१४ मार्च रोजी दुपारी ०३.३० ते ०५.३० वाजे दरम्यान राहात्या घरातून गायब झाली आहे.तिला अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे.तिची उंची ०५ फूट असून शरीराने सडपातळ आहे.तिच्या अंगात पंजाबी लाल रंगाचा ड्रेस व निळी जीन्स पॅन्ट असून केस काळे व लांब आहे.व पायात काळे सॅंडल आहे.सदर मुलीचा पिता नाही सर्व जबाबदारी आईवर असल्याने ती सैरभैर झाली आहे.मात्र तिला पोलीस मदत करत नसल्याची चर्चा आजूबाजूच्या नागरिकांत चर्चा सुरु आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अद्याप काहीही तपास केलेला नाही.या बाबत उलटसुलट चर्चा ऐकू आली आहे.मुलीच्या आईने याबाबत तपास लावण्यासाठी टाहो फोडला आहे.या बाबत पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या पहिल्या दोन घटनेत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तर शेवटच्या एक घटनेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close