जाहिरात-9423439946
उद्योग

एमआयडीसी मूळे…या मतदार संघाच्या विकासाला गती-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  महायुती सरकारने बुधवार दि.२९ रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे,सोनेवाडी शिवारात एमआयडीसीला दिलेली मंजुरी केलेल्या पाठपुराव्याचे फलित असून मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय आहे.त्यामुळे मतदार संघाच्या विकासाला अधिकची चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन  आ.आशुतोष काळें यांनी केले असून त्याबद्दल महायुती सरकारचे तसेच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे त्यांनी आभार मानले आहे.

  

“कोपरगाव मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने एम.आय.डी.सी.उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असून कोपरगाव शहराच्या नजीक असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या जागेच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आ.काळे यांनी मतदार संघातील जनतेला औद्योगिक केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून आ. आशुतोष काळे मतदार संघातील तरुणाईला रोजगार उपलब्ध होवून मतदार संघाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात औद्योगिक केंद्र (एम.आय.डी.सी.) उभारावी याबाबत त्यांचा  पाठपुरावा सुरु होता.त्याबाबत १४ मार्च २०२० रोजी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई व उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांना त्यांनी लेखी निवेदन दिले होते.या शिवाय दि.२७ जुलै २०२३ रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघातील तरुणाच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते.त्यामुळे मतदार संघात एम.आय.डी.सी. झाल्यास बेरोजगार तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देवून त्याबाबत आ. काळे यांची त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती.त्या चर्चेची व आ.काळे यांनी केलेल्या निस्वार्थ पाठ्पुराव्याने महायुती शासनाने मतदार संघातील चांदेकसारे,सोनेवाडी शिवारात एमआयडीसीला मंजुरी दिली असल्याचा दावा केला आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून एम.आय.डी.सी. उभारण्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी त्यांच्याशी चर्चा करून २७ जुलै २०२३ रोजी पत्र दिले होते. 

    कोपरगाव मतदार संघाला ऐतिहासिक,पौराणिक पार्श्वभूमी असून मतदार संघात रेल्वे स्टेशन,विमानतळ,समृद्धी महामार्ग,सिन्नर-शिर्डी महामार्ग (एन. एच.१६०),सावळीविहीर-शेंधवा महामार्ग (एन.एच.७५२ जी),नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवे व प्रस्तावित सुरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात आहे.एकूणच एम.आय.डी.सी.उभारण्यासाठी अनुकूल परिस्थिती कोपरगाव मतदारसंघात आहे.त्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व आ.काळे यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांची दखल घेवून महायुती सरकारने चांदेकसारे,सोनेवाडी शिवारात एमआयडीसीला दिलेली मंजुरी मतदार संघाच्या अधिकच्या विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचा दावा आ.काळे यांनी शेवटी केला आहे.

राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेवून एम.आय.डी.सी. उभारण्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी त्यांच्याशी चर्चा करून २७ जुलै २०२३ रोजी पत्र दिले होते. 

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close