जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन गटात तुंबळ मारहाण,दोन गंभीर जखमी,बारा जणांवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या मच्छीन्द्र कोळपेसह सुनील कोळपे व अन्य दहा ते बारा जणांनी आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांस लोखंडी रॉड व टोकदार हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा फिर्यादी शांताराम भानुदास वाबळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे सुरेगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान यात फिर्यादी हे माजी सरपंच शशिकांत वाबळे यांचे बंधू असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान यात एका महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी शांताराम कोळपे,शशिकांत बाबळे,पांडुरंग आरोटे,अक्षय कदम यांनी आपले पतीस बोलवून घेतले व त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून लाकडी दांडक्याने मारहाण करून यांचे विरुद्ध आपला विनयभंगाचा व आपल्याला दगड घालून मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


   सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शांताराम वाबळे हे सुरेगाव येथील रहिवासी असून त्यांचे बंधू शशिकांत वाबळे हे त्याच गावचे माजी सरपंच आहे.ते आपल्या परिवारासह गावात राहतात.त्यांची गट क्रं.१३६ मध्ये शेत जमीन सुरेगाव शिवारात असून त्यांनी आपल्या शेतीसाठी गोदावरी कालव्यावरून सुमारे साडेतीन कि.मी.वरून जलवाहिनी टाकून आपल्या शेतीसाठी पाणी आणले आहे.त्यांच्या शेजारी आरोपी मच्छीन्द्र अण्णासाहेब कोळपे यांची शेतजमीन आहे.मागील काही दिवसात जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्याचे नूतनीकरण सुरु होते.त्या दरम्यान त्यांनी सर्व जलवाहिन्या काढून टाकल्या होत्या.त्यात फिर्यादी शांताराम वाबळे व आरोपी सुनील कोळपे यांचीही जलवाहिनी काढून टाकली होती.त्यात आरोपी अण्णासाहेब कोळपे हे फिर्यादीला संशयावरून कायम,”तूच माझी जलवाहिनी दुरुस्त करून दे” असा तगादा लावला होता.त्यावर फिर्यादी हे कायम सदर जलवाहिणीचा व आपला काहीही संबंध नाही असे सांगून वेळ निभावून नेत होता.मात्र दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास फिर्यादी शांताराम वाबळे हे आपल्या घरी येत असताना त्यांना प्रमुख आरोपी अण्णासाहेब कोळपे यांचा दूरध्वनी आला होता.त्याने त्यांना तू,नामदेव बाबुराव कोळपे यांचे वस्तीजवळ गोदावरी काळव्याजवळ ये”असे सांगून येण्यास फार्मावले होते.त्या दरम्यान ते आपला जोडीदार अमोल प्रकाश वाबळे यास घेऊन गेले असताना मच्छीन्द्र कोळपे हा त्या ठिकाणी एकटा उभा होता.व त्या ठिकाणी ते दोघे पोहचल्यावर त्याने फिर्यादिस,” तू आमची जलवाहिनी दुरुस्त करून दे…! असा तगादा लावला होता.त्यावर फिर्यादीने आपला व तुझ्या जलवाहिणीचा काही संबंध नाही असे बजावले होते.त्याचा राग येऊन त्याने वाईट-साईट शिवीगाळ सुरु केली होती.त्यास आपण हरकत घेतली असता त्याने तुझा काटाच काढून टाकतो” अशी धमकी दिली होती.व आपल्या फोनवरून त्याच्या अन्य साथीदारांना बोलवून घेतले होते.ते अवघ्या काही वेळात घटनास्थळी आले होते.त्यांत सुनील वाल्मिक कोळपे,अजित सुरेश कोळपे,नितीन हाळनोर,(पूर्ण नाव माहिती नाही) हे आपल्या हातात लाल रंगाची काठी घेऊन व त्यास एका बाजूस टोकदार धार असलेली होती.तर बाबासाहेब अण्णासाहेब कोळपे याचे हातात लोखंडी रॉड व तर अन्य पाच सहा जणांच्या हाती लाकडी दांडे व लोखंडी गज होते.त्यांनी आपल्यावर हल्ला चढवला होता.त्यात आपण गंभीर जखमी झालो असून डाव्या पायाचे नडघीवर व  पंजावर फ्रॅक्चर झाले असल्याचा दावा केला आहे.या दरम्यान आपली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कोणीतरी बळजबरीने काढून घेतली आहे.

  

दरम्यान आपण खाली पडलो असता आपण सदरची घटना आपले बंधू शशिकांत वाबळे यांना कळवली होती.त्यांनी व त्यांचा सहकारी बाबासाहेब भानुदास वाबळे,अक्षय कैलास कदम,अमोल प्रकाश वाबळे आदींनी आपल्याला घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी आणली होती.मात्र त्यांना पाहुन सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते.आपल्या बंधूनी आपल्याला गाडीत घालून कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.

  या प्रकरणी गांभीर्य ओळखून घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आदींनी भेटी दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५५../२०२३ भा.द.वि.कलम ३०७,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास  पोलीस निरिक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.

  दरम्यान यात एका महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी शांताराम कोळपे,शशिकांत बाबळे,पांडुरंग आरोटे,अक्षय कदम यांनी आपले पतीस बोलवून घेतले व त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून लाकडी दांडक्याने मारहाण करून यांचे विरुद्ध आपला विनयभंगाचा व आपल्याला दगड घालून मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान यात आपली सात ते आठ तोळ्याची पोत गायब झाली असल्याचा दावा केला आहे.त्याबाबत सुरेगाव आणि परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या गुंह्यातील आरोपीना जिल्हा व सत्र न्यायालयाने दि.०२ डिसेंबर पर्यंत तात्पुरता जमीन मंजूर केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close