जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करा-मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर अत्यंत खालच्या पातळीवरचे आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले असून सावित्रीबाई फुले यांच्या बदनामीचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही.आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या या वेबसाईटवर तातडीने कडक कारवाई करा अशी मागणी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने प्रभारी तहसीलदार विकास गंबरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

“इतिहासाची मोडतोड करून महापुरुषांबाबत अपमानजनक लिखाण करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे.त्यासाठी शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर कायमची बंदी आणून लिखाण करणाऱ्या लेखकावर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करा”-दिनार कुदळे,संचालक,कर्मवीर काळे कारखाना.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”सावित्रीबाई फुले यांच्या योगदाना बाबत ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर करण्यात आलेल्या लेखात वापरण्यात आलेली अपमानजनक भाषा वेदनादायी आहे.छत्रपती शाहू, फुले,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांचा अपमान करण्याचा प्रयत्न संतापजनक असून त्याचा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करीत आहे.

इतिहासाची मोडतोड करून महापुरुषांबाबत अपमानजनक लिखाण करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे.त्यासाठी शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ नामक वेबसाईटवर कायमची बंदी आणून लिखाण करणाऱ्या लेखकावर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,रमेश गवळी,माया खरे, राजेंद्र वाकचौरे,सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,अशोक आव्हाटे,संदीप कपिले,अनिल पांढरे, बापूसाहेब इनामके,व्ही.एस.देवरे,राजेंद्र बोरावके,अमोल गिरमे,योगेश वाणी,पठाडे,सदाशिव रासकर,राहुल राठोड, अनिरुद्ध काळे,मंगेश झगडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close