जाहिरात-9423439946
आंदोलन

ग्रामसमृद्धी योजनेत भ्रष्टाचार,कोपरगावात तहसीलसमोर आंदोलन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुण नवनाथ पांडुरंग वाघ याने ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गाय-गोठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून गरजू ग्रामस्थांना वगळून सधन वर्गातील धनदांडग्यांना लाभ दिला असल्याचा आरोप करत या प्रकरणी तहसीलदार यांनी कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन सुरु केले आहे.आ.आशुतोष काळे यांच्या गावातच हा प्रकार घडल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदर प्रसंगी आंदोलन कर्ते नवनाथ वाघ व प्रहार संघटनेच्या वतीने शिर्डी विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना अड.योगेश खालकर व सहकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दरम्यान लाभ घेतलेल्या लाभार्थ्यात सदर तक्रारदाराने दिलेल्या माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत मिराज सुंदरराव काळे,रावसाहेब माधव काळे,कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे आदींच्या नावाचा उल्लेख आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यात तथ्य असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यामुळे हे प्रकरण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आता कोणते वळण घेते याकडे तालुक्यातील राजकीय निरीक्षक व नागरिकांचे लक्ष लागून आहे.या संबंधी गटविकास अधिकारी सूर्यवंशी व संबंधित गावचे सरपंच यांना भ्रमणध्वनींद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

दि.९ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामीण भागात पाहिलं तर शेतकऱ्यांना महत्त्वाचे असणारे बाबींमध्ये गाई-म्हशींसाठी गोठा त्याचप्रमाणे शेळी साठी शेड त्याचप्रमाणे कुकुट पालनासाठी शेड,नाडेप कंपोस्ट,वृक्षलागवड किंवा इतर काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ज्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून राबविल्या जातात.
शेतकऱ्यांना एक स्वयंपूर्ण करणे एक समृद्ध करणे असे उद्दिष्ट ठेवून गाई म्हशी वाटप योजना-२०२१ ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.या योजनेच्या संयोजनातून होण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडलेला आहे.वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना समृद्ध करण्याचं एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेला आहे.मात्र याबाबत कोपरगाव तालुक्यात नेमका उलट अनुभव येत असून यात सधन वर्गातील लाभार्थ्यांना व पंचायत समिती पदाधिकारी यांना लाभ देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याबाबत माहेगाव देशमुख या आ.आशुतोष काळे यांच्याच गावात हा कहर उडाला आहे हे विशेष !
यात तक्रार करणाऱ्या तरुणाने म्हटले आहे की,”आपण या पूर्वी नगर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना या संबंधी पत्र पाठवून या संबंधी कार्यवाही करण्याची विनंती केली होती.त्यानुसार त्यांनी सरकारी यंत्रणेस या संबंधी संपूर्ण चौकशी करून संबंधितास उपोषणापासून प्रवृत्त करण्यास कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना बजावले होते.मात्र गटविकास अधिकारी यांनी या पत्रास केराची टोपली दाखवली आहे.त्यामुळे आपण आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
त्यात त्यांनी गाय-गोठा प्रकरणाची चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी,सदर प्रकरणी दोषी असलेल्या पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करावे,पंचायत समितीचे सभापती,उपसभापती यांनी पाच वर्षांच्या कालखंडात राबवलेल्या योजनांची चौकशी त्रिपक्षीय समितीकडून चौकशी करून कारवाई करावी,अनुदानित गाय-गोठा प्रकरणावरून दि.२८ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या ग्रामसभेत ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी व लोकांनी अर्जदार आकाश काळे व नवनाथ वाघ यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करावी.त्यासाठी चलचित्रफीत ग्राह्य धरावी.ज्या अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला त्यांच्याकडून वसुली करावी,अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे,व आगामी निवड प्रक्रिया व लाभार्थी निवड हि सोडत पद्धतीने व्हावी अशा सात मागण्या केल्या आहेत.दरम्यान या गैर प्रकारांत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पंचायत समितीचे पदाधिकारी यांना लाभ घेता येत नसतानाही त्यांनी लाभ घेतला असल्याचा आरोप केला आहे.
निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक,तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे,कोपरगाव पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,वासुदेव देसले आदींना दिल्या आहेत.

दरम्यान या संबंधी गटविकास अधिकारी सूर्यवंशी व संबंधित गावचे सरपंच यांना भ्रमणध्वनींद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.तथापि आज गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या प्रकरणी येत्या २४ फेब्रुवारी पर्यंत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.तथापि आंदोलनकर्ते यांनी ग्रामसभेत शिवीगाळ केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.त्यामुळे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close