जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन गटात धक्काबुक्की,कोपरगावात सात जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण पंचवीस की.मी.अंतरावर असलेल्या तळेगाव मळे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेचा पती विलास वाळे यास आरोपी शुभम बाबासाहेब जाधव,चंद्रकांत सखाराम जाधव,रवींद्र चंद्रकांत जाधव,आदींसह सात जणांनी द्राक्ष बागेतील पक्षी हाकलण्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी,करून धक्काबुक्की दिली व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा रंजना विलास वाळे (वय-४७) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तळेगाव मळे येथील आरोपी शुभम जाधव,चंद्रकांत जाधव,रवींद्र जाधव,बाबासाहेब सखाराम जाधव,ज्ञानेश्वर सखाराम जाधव,पंकज बाबासाहेब जाधव, संगीता चंद्रकांत जाधव आदी एकत्र आले व त्यानीं फिर्यादी महिला रंजना वाळे व त्यांचा पती विलास वाळे याना शिवीगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की केली आहे.व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे सदर कुटुंब धास्तावून गेले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि तळेगाव मळे येथील रहिवासी असून ती आपल्या पती व अन्य कुटुंबासह रहाते.तिचा शेतीचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या ग.क्रं.१०२/२ मध्ये द्राक्ष बाग केलेली आहे.वर्तमानात सदर बाग काढणीस आलेली आहे.त्यामुळे सदर बागेत पक्षी उपद्रव पोहचत आहे.त्यामुळे त्या बागेत सदर पती-पत्नी हे बागेतील पक्षी हाकलण्याचे काम दि.०९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास करत असताना आरोपी शुभम जाधव,चंद्रकांत जाधव,रवींद्र जाधव,बाबासाहेब सखाराम जाधव,ज्ञानेश्वर सखाराम जाधव,पंकज बाबासाहेब जाधव, संगीता चंद्रकांत जाधव आदी एकत्र आले व त्यानीं फिर्यादी महिला रंजना वाळे व त्यांचा पती विलास वाळे याना शिवीगाळ दमदाटी करुन धक्काबुक्की केली आहे.व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे सदर कुटुंब धास्तावून गेले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान फिर्यादीचा पती आजारी असल्याने हा गुन्हा आठवडाभराने उशीरा दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.१/४७/२०२२ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close