कोपरगाव तालुका
जलसंपदा मंत्री यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,फकीर कुरेशी,जावेद शेख,चंद्रशेखर म्हस्के,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,मुकुंद इंगळे,इम्तियाज अत्तार,राजेंद्र खैरनार,आकाश डागा,रवींद्र राऊत,मनोज नरोडे,दिलीप शिंदे,बाळासाहेब शिंदे,पुंडलिक वाघ,भाग्यश्री बोऱ्हाडे,शितल लोंढे,शितल वायखिंडे,कविता जिरे आदी मान्यवर उपस्थित होते.