जाहिरात-9423439946
आंदोलन

…या गावातील शांतता भंग,पोलिस कारवाई करणार का ?-परजणेंचा सवाल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

     संवत्सर गावाला पौराणिक,धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने गावातील विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना काही ठराविक नतद्रष्ट लोकांकडून गावातील जातीय सलोखा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्याला कोपरगाव शहर पोलिसांकडून अभय मिळत असल्याने ते जास्त शेफारले असून त्यांच्याकडून शांतता भंग झाल्यास कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी आज संवत्सर येथील एका बैठकीत दिला आहे.

   

अवैध वाळू व्यवसायाची झळ आ.आशुतोष काळे यांना बसलेली असताना व त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झालेला असताना आता ही झळ थेट संवत्सर गावाला बसली असून त्याची प्रचिती नुकतीच संवत्सर येथील ग्रामसभेत आली असून जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांना बसली असल्याचे संवत्सर गावात महाराष्ट्र दिना निमित्त नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत पाहायला मिळाला आहे.

  कोपरगाव तालुक्यात आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे त्याची किंमत नागरिकांना चुकवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.काकडी येथे दरोड्यात तीन बळी गेले तर कोपरगाव शहराच्या मध्यवस्तीत सचिन वॉच कंपनीत बिहार मधील दरोडेखोरांनी पहाटे लुटले असून जवळपास बत्तीस लाखांचा माल लुटला असल्याचे उघड झाले आहे.दुचाकी,आणि चार चाकी चोर आणि दागिने चोरांची तर गोष्टच नको अशी वस्तूस्थिती आहे.याखेरीज वाळूचोर शिरजोर बनले आहेत.गावठी कट्टे मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे दिसून येत आहे ते किरकोळ कारणावरून कोणालाही धमकवताना दिसत आहे.अवैध दारू,गुटखे व्यवसायाला बरकत आली आहे.भ्रष्ट प्रशासन ही मोठी चिंता ठरली आहे.दर दोन तीन महिन्याला एखादा अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सहज अटकत आहे.या अवैध वाळू व्यवसायाची झळ आ.आशुतोष काळे यांना बसलेली असताना व त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झालेला असताना आता ही झळ थेट संवत्सर गावाला बसली असून त्याची प्रचिती नुकतीच संवत्सर येथील ग्रामसभेत आली असून जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांना बसली असून त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट संवत्सर गावात महाराष्ट्र दिना निमित्त नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत पाहायला मिळाला आहे.मात्र यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी मात्र या ग्रामसभेला दांडी मारली असल्याचे दिसून आले आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नसल्याची माहिती आहे.या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

    सदर प्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,कोपरगांव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक एस.सी.पवार,ठाणे अंमलदार जालिंदर तमनर,सरपंच सुलोचना ढेपले,सदर सभेला पोलीस पाटील लीनाताई आचारी,चंद्रकांत लोखंडे,दिलीपराव ढेपले,शिवाजीराव गायकवाड,लक्ष्मणराव साबळे,सोमनाथ निरगुडे,तलाठी श्रीमती वाडेकर,कृषी सहाय्यक श्रीमती कांबळे मॅडम,विद्युत वितरणचे अधिकारी श्री बोंडखळ,तुषार बाराहाते,ज्ञानदेव कासार,अनिल आचारी,मधुकर साबळे,सुभाष लोखंडे,ज्ञानदेव  पावडे, संभाजीराव भोसले,अविनाश गायकवाड,बाळासाहेब गायकवाड,संजय भाकरे,बाबुराव मैद,बापू तिरमखे,ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे,लक्ष्मणराव परजणे,महेश परजणे,शेखर देशमुख,माजी पोलिस अधिकारी श्री लोखंडे,दिलीप बोरनारे व संवत्सर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“कोपरगाव शहर पोलिस विभागाने संवत्सर गांवातील वातावरण दुषित करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कठोर कारवाई करावी.याची दखल घेतली नाही तर कायदा सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार नाही.आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो असून या अवैध व्यवसायावर अल्पावधीत वचक बसणे गरजेचे आहे.पोलिसांकडून जर कारवाई होणार नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल”- राजेश परजणे,माजी जिल्हा परिषद सदस्य,अहील्यानगर.

   त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून संवत्सर गावची संस्कृती टिकून असून गावामध्ये शांतता टिकून असताना गेल्या काही दिवसापासून गावामध्ये अशांतता व दहशत निर्माण करण्याचे काम काही नतद्रष्ट लोक करीत आहेत.शाळेचा परिसर तसेच गावातील चांगल्या वाड्या वस्त्यांमध्ये दारू व्यवसाय,मटका,जुगार असे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत.यासंदर्भात  पोलीस विभागाला सांगून देखील कोणतीही कारवाई होत नाही.परिणामी हे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर फोफावत चालले आहेत.गावातील शांतता व सलोखा या प्रकारामुळे भंग पावत आहे.गावामध्ये काही तरुण वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करून दहशत व भांडणे निर्माण करतात.जेलमधून बाहेर आलेल्या व्यक्तीची गावात मिरवणूक काढून गांवातील वातावरण दुषित करत आहे.परिणामी चांगल्या तरुणावर वाईट संस्कार घडत आहेत.कोपरगांव तालुक्याला यापूर्वी गोविंद पवार,यादवराव पाटील,प्रकाश कवडे,राकेश मानगांवकर असे धाडसी व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी लाभले होते.त्यावेळी दोन पोलिस ठाणे नव्हते तरी त्यांचे अवैध व्यवसायावर नियंत्रण होते.त्यांच्या काळात कोणत्याही मोठ्या दंगली अथवा वाईट प्रकार घडलेले नाहीत.सद्याच्या काळात मात्र पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.खाकीचा धाक आणि आत्मीयता राहिलेली दिसत नाही.पोलिस स्टेशनला एखादा माणूस तक्रार नोंदविण्यासाठी गेला तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही.त्याला न्याय मिळत नाही.अनेक जण राजरोस गावठी कट्टे घेऊन हिंडत आहे आणि बिट हवालदार म्हणतो,” आम्हाला माहिती नाही” हे आक्रित आहे.पोलिस प्रशासन या गुन्हेगारीला सामील असल्याचा आमचा दाट संशय असल्याचा आरोप करून तुम्हाला हे आवरत नसेल तर आम्हाला सांगा असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.गाव शांत आहे तो पर्यंत ठीक आहे.पण तुम्ही आग्या मोहाळाला दगड मारण्याचे धाडस करू नका असे आवाहन करून त्यांनी पोलिस प्रशासन बीड मधील मस्साजोग व्हायची वेळ पाहत आहे का ? असा कटू सवाल त्यांनी केला आहे.आमच्या संवत्सर गांवातील एकोपा व सलोखा आबाधित राहण्यासाठी सर्व जातीधर्माचे व विविध पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ राजकीय जोडे बाजुला ठेऊन आज एकत्र आलेले आहेत.याची दखल घेऊन कोपरगाव शहर पोलिस विभागाने संवत्सर गांवातील वातावरण दुषित करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कठोर कारवाई करावी.याची दखल घेतली नाही तर कायदा सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार नाही.आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो असून या अवैध व्यवसायावर अल्पावधीत वचक बसणे गरजेचे आहे.पोलिसांकडून जर कारवाई होणार नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.संवत्सरगावाचा परिसर मोठा असून या गावाला प्राचीन,अध्यात्मिक तसेच मोठ्या संतांची परंपरा लाभली आहे.असल्याने गांवात सतत काहिना काही गैरप्रकार घडतच असतात.यासाठी संवत्सरला पोलीस चौकी सुरु करण्यासाठी आम्ही जागेची देखील व्यवस्था करून देत आहोत याची दखल घेऊन संवत्सरला लवकरात लवकर पोलिस चौकी सुरु करावी अशीही मागणी त्यांनी केली.

      शिर्डी उपबिभागीय पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी उत्तर देताना आमची पोलीस यंत्रणा गुन्हेगारी चळवळीसाठी कोणासही पाठीशी घालणार नाही.गुन्हेगारी लोकांचा आम्ही बंदोबस्त करू.त्यांना तडीपार करण्याचे गुन्हे दाखल करू यापुढे आमची यंत्रणा सतर्क राहील.कायद्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे निर्णय घेणे पोलिस यंत्रणेला कधी कधी अवघड होते तरी सुद्धा अनेक गुन्हेगारास आम्ही अटक केलेली असून गावात दहशत पसरविणाऱ्या लोकांचा सुद्धा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

   सदर प्रसंगी माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख,ॲड.शिरीषकुमार लोहकणे,मधुकर साबळे,राजेंद्र लोखंडे,अशोकराव थोरात आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close