जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

हिंदू मंदिराविषयी द्वेष पसरवणार्‍यास दहशतवादी घोषीत करा-मागणी 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे,तसेच मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणार्‍या शस्त्र बनवणार्‍या कारखान्यात जाणे अधिक चांगले अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या झाकीर नाईक या इसमास दहशतवादी घोषित करा अशी मागणी कोपरगाव येथील हिंदू संघटनांनी नुकतीच कोपरगाव येथे  केली आहे.

   

“इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचा डॉ.झाकीर नाईक याने ‘हुडा टी.व्ही.’नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष,घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरविण्याचे निंदनीय काम केले आहे”-हिंदु जनजागृती समिती,कोपरगाव.

   ‘हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे,तसेच मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणार्‍या शस्त्र बनवणार्‍या कारखान्यात जाणे अधिक चांगले.मंदिर किंवा चर्च येथे ‘शिर्क’ (महापाप) केले जाते.‘शिर्क’ हे इस्लामनुसार महापाप आहे.अल्लाहने स्पष्टपणे म्हटले आहे की,मी कोणालाही माफ करू शकतो,पण ‘शिर्क’ केलेल्याला कधीही माफ करत नाही…’, अशी मुक्ताफळे व अनेक आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचा डॉ.झाकीर नाईक याने ‘हुडा टी.व्ही.’नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना केली आहेत.यातून कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी समाजात जातीय विद्वेष,घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने केले आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषीत करण्यासाठी,तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरगाव येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लिता सातपुते यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे.या वेळी निवेदन देतांना सनी गायकवाड,अशोक नायगुडे,सनी काळे,राहुल चवंडके,प्रसाद निकम,ओमकार जाधव,दत्ता भागिले,विवेक गर्जे,प्रसाद सारंगधर,योगेश रुईकर,आकाश वैद्य हे धर्माभिमानी उपस्थित होते.

केंद्र सरकारने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातल्यानंतरही झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबूक, ट्वीटर,इंस्टाग्राम आदी सर्व अनेक सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट सुरू आहेत.ती सर्व त्वरित बंद करण्यात यावीत अशा मागण्याही शेवटी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close