जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये २००६ साली दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यात तब्बल १८ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले असल्याचे दिसून आले आहे.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकवृंदाचा सन्मान केला आहे.

  

“गोधेगाव येथील शाळेची जुनी इमारत सुशोभिकरण करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छे व क्षमतेनुसार आर्थिक मदत करावी”-श्री.जुंदारे,प्राचार्य,न्यू इंग्लिश स्कूल,गोधेगाव.ता.कोपरगाव.

  या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी सहशिक्षक श्री.दाभाडे एम व्ही होते.प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजी पाटील सर,श्री.पंडोरे सर,श्री.साळवे सर,श्री.निंबाळकर सर,श्री.दाभाडे सर,श्री.शिंदे सर,श्री.रांधवणे सर,श्री.वाबळे सर, श्री. गोरे मामा व विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री.जुंदारे सर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

   सदर प्रसंगी प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात सरस्वती पूजन,कर्मवीर आण्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शिवाजी शिरसाठ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची संकल्पना मांडणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

  विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री.जुंदारे सर यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यालयाच्या जुन्या व चालू कार्याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.तसेच शाळेची इमारत ही नवीन व सुशोभिकरण करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छे व क्षमतेनुसार आर्थिक मदत करण्याचे आव्हान उपस्थितांना केले.विद्यालयाचे माजी शिक्षक शिवाजी पाटील यांनी कर्तृत्ववान पिढी घडवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही सजग राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

   या वेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या गमतीजमती तसेच आठवणी सांगून सर्वांना भुतकाळात नेले.या वेळी नागरिकांच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी शाळेत लहान होऊन रमले होते.१८ वर्षांपूर्वी ज्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्या शाळेत आज आपली मुले,मुली शिक्षण घेत आहेत या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत रममाण होता आले.त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद ओसंडून वाहत होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दाभाडे एम.व्ही.यांचेसह उपस्थितांचा सत्कार करण्यात आला आहे.हा स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या आयोजनात सर्जेराव भुजाडे,गणेश भोकरे,शिवाजी शिरसाठ,अनिल गायकवाड,रमेश दुशिंग,चिंतामण भोकरे,गणेश नेहरे,संतोश टुपके व रोहिणी शिंदे,निलम शिंदे तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर प्रसंगी माजी विद्यार्थी संदीप शिरसाठ व गणेश भोकरे यांनी प्रास्ताविक केले तर माजी विद्यार्थी सर्जेराव भुजाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे तर कार्यक्रमाच्या शेवटी निलम शिंदे हिने सर्वांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close