शैक्षणिक
…या विद्यालयाची यशाची परंपरा कायम !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वाकडी येथील वर्धमान शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान संचालित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची इ. १० वी च्या परिक्षेत १००%
निकाल ची परंपरा कायम राखली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या विद्यालयात प्रथम क्रमांक रोहन संजय शेळके याने ९४.२०% गुण मिळवून राखला आहे तर द्वितीय क्रमांक गाढवे प्रतीक्षा शिवाजी याने ९२.८०% गुण मिळवून शिखर गाठले आहे,तृतीय क्रमांक गोर्डे ओम शिवाजी ९२.६०% मिळवत मोठे यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ मध्ये घेतलेल्या इ. १० वी च्या परिक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल वाकडी गणेशनगर या विद्यालयाने लक्षवेधी यश संपादन केले आहे.या विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या स्थापनेपासूनची शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.
दरम्यान या विद्यालयात प्रथम क्रमांक रोहन संजय शेळके याने ९४.२०% गुण मिळवून राखला आहे तर द्वितीय क्रमांक गाढवे प्रतीक्षा शिवाजी याने ९२.८०% गुण मिळवून शिखर गाठले आहे,तृतीय क्रमांक गोर्डे ओम शिवाजी ९२.६०% मिळवत मोठे यश प्राप्त केले आहे.
विद्यालयातील ०८ विद्यार्थी ९०% गुण मिळवत उत्तीर्ण झाले तर १८ विद्यार्थी ८०% च्या पुढे गुण मिळवत विशेष प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले,संस्थापक बबनराव पा.घोरपडे,संचालिका शोभा घोरपडे,प्राचार्य संभाजी भागडे यांच्यासह सर्व विश्वस्त व शिक्षक,शिक्षकवृंद आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.